जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी पुरुषांनी मारले वडाला सात फेरे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 04:30 PM2019-06-16T16:30:44+5:302019-06-16T16:34:29+5:30
जन्माेजन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी पुरुषांनी वडाच्या वृषाला फेऱ्या मारल्या. पिंपरीतील सांगवी भागात हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.
सांगवी : मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेच्या वतीने चक्क पुरुषांनी वटपौर्णिमा साजरी केली. जन्मो जन्मी हीच पत्नी मिळावी,यासाठी पुरुषांनी वडाच्या वृक्षाला सात फेरे मारले. चार वर्षांपासून हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे.
महिलांच्या पारंपरिक सणात पुरुषांनी सहभाग घेतल्याने सदर कार्यक्रमास एक विशेष महत्व आल्याचे नागरिकांनी यावेळी मत व्यक्त केले. सत्यवानाला साक्षात यमाच्या दारातून परत आणणाऱ्या सावित्रीच्या त्यागाची व पतिव्रतेचे महत्व असलेल्या वटसावित्री पौर्णिमेस विशेष महत्व असून महिला या दिवशी उपवास करतात. पुरुषांनीही यासाठी वटवृक्षाचे पूजन केले तर ती खरी समानता होईल ही भावना मनात ठेऊन मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेच्या वतीने पुरुषांनी वटपौर्णिमा साजरी केली. स्त्री समानता प्रत्यक्ष कृतीतून दिसली पाहिजे व त्या भावनेने पुरुषही स्रियांसोबत आहेत हा आगळ्या वेगळ्या उपक्रमामागील मागील उद्देश असल्याचे संस्थेच्या वतीने अण्णा जोगदंडे यांनी यावेळी सांगितले. चाळीस पुरुषांनी वडाच्या झाडाला सूत बांधून प्रदक्षिणा मारल्या व पत्नीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वटसावित्रीचे खरे पूजन केल्याचे समाधान मिळाल्याचे सांगितले. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर, पिंपरी चिंचवड अध्यक्ष अण्णा जोगदंड, शहर उपाध्यक्ष विकास शहाणे, मराठवाडा विकास मंचचे अरुण पवार, एस. डी. विभूते, संगीत जोगदंड,अँड.सचिन काळे, अरुण पाखरं अरविंद मांगले, वसंतराव चकटे,पी.पी.पिल्ले, शांताराम पाटील,मुरलीधर दळवी,हनुमन्त पंडित,दीपक शहाणे,गजानन धाराशिवकर,दत्तात्रय घोरपडे,प्रकाश बंडेवार, शिवानंद तालिकोटी सुरेश पेठकर ,अप्पाजी चव्हाण, जीवन धवण आदींनी सहभाग घेतला.