उसने दिलेले पैसे परत मागितल्याने मानसिक त्रास; तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

By नारायण बडगुजर | Published: August 6, 2024 01:49 PM2024-08-06T13:49:20+5:302024-08-06T13:49:32+5:30

तरुणीने उसने पैसे दिल्यावर ते परत मागितले असता आरोपीने मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली

Mental distress due to repayment of loaned money; An extreme step taken by the young woman | उसने दिलेले पैसे परत मागितल्याने मानसिक त्रास; तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

उसने दिलेले पैसे परत मागितल्याने मानसिक त्रास; तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

पिंपरी : उसने दिलेले पैसे परत मागितले म्हणून तरुणीला मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केले. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला. मोशी येथे आदर्शनगरमध्ये ३१ जुलै रोजी ही घटना घडली.

पायल मच्छिंद्र कोकाटे (१८ वर्ष ११ महिने) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. राम कोकणे (रा. अजनावळे, ता. जुन्नर, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत आई नंदा मच्छिंद्र कोकाटे (४८, रा. मु. पो. बोतार्डे, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी याबाबत सोमवारी (दि. ५) एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. बीएनएस २०२३ कायदा कलम १०८ अन्वये पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम कोकणे याला फिर्यादी नंदा यांची मुलगी पायल हिने उसने पैसे दिले होते. हे पैसे परत मागितले असता कोकणे याने पैसे देण्यास टाळाटाळ करून केली. तसेच तिला मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून तिने राहात असलेल्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

Web Title: Mental distress due to repayment of loaned money; An extreme step taken by the young woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.