मेट्रोच्या भोंगळ कारभाराने अडकली बीआरटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 06:31 AM2018-05-14T06:31:24+5:302018-05-14T06:31:24+5:30

: मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील स्वारगेट ते पिंपरी मार्गाच्या कामांमुळे दापोडी-निगडी बीआरटीचा प्रकल्प अडचणीत आला आहे. बीआरटी मार्गाचे काम पूर्णत्वास आले

Metro carrier gets stuck in BRT | मेट्रोच्या भोंगळ कारभाराने अडकली बीआरटी

मेट्रोच्या भोंगळ कारभाराने अडकली बीआरटी

Next

विश्वास मोरे
पिंपरी : मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील स्वारगेट ते पिंपरी मार्गाच्या कामांमुळे दापोडी-निगडी बीआरटीचा प्रकल्प अडचणीत आला आहे. बीआरटी मार्गाचे काम पूर्णत्वास आले असताना महामेट्रोकडून विनापरवाना खोदाई सुरू आहे़ मुख्य लेन तोडल्यामुळे बीआरटी कॉरिडोअरवर केलेला २४ कोटींचा खर्च वाया जाणार आहे. बीआरटी मार्ग सुरू होण्यास मेट्रो कामाचा अडथळा आहे.
महापालिकेच्या दापोडी ते निगडी बीआरटी मार्गाला न्यायालयाने हिरवा कंदील दिला. तरी मेट्रोच्या कामामुळे पुन्हा एकदा बीआरटी प्रकल्पाचा नव्याने आराखडा व नियोजन करावे लागणार आहे. मेट्रोकडून कामांची दुरुस्ती झाल्यानंतरच वाहतूक सेवा सुरू करावी लागणार आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहराची सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने मेट्रो प्रकल्प राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात पिंपरी ते स्वारगेट हा टप्पा होत आहे. पिंपरी ते स्वारगेट हे अंतर १४.५ किलोमीटर आहे. तर त्यावर १४ बसथांबे आहेत. निगडी ते पिंपरी या मार्गावर सहा थांबे असणार आहेत. मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, मेट्रो रेल प्रकल्प आणि महापालिका यांच्या समन्वयाचा अभाव असल्याने त्याचा आर्थिक फटका बसत आहे.

पालिकेने थांबविले खोदाईचे काम
बीआरटीमार्गातच मोरवाडी ते एम्पायर इस्टेट पुलापर्यंत खोदाई केली आहे. ही खोदाई महापालिकेला विचारून न केल्याने महापालिकेने हे काम थांबविले आहे. बीआरटी मार्गात खोदाई करताना मेट्रोने महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे. ते न घेतल्याने खोदाईचे काम अर्धवट स्थितीत थांबविले आहे. या महिनाभरात या मार्गावरून सुरू होणाऱ्या बीआरटी सेवेला खोडा बसणार आहे. नियोजनाच्या अभावामुळे मेट्रोमुळे बीआरटी मार्ग अडचणीत आला आहे.

नियोजनाअभावी
बीआरटीचे नुकसान
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात काम करताना मेट्रोने महापालिकेच्या अधिकाºयांशी संवाद साधणे गरजेचे आहे. मात्र, मनमानी पद्धतीने काम सुरू आहे. पिंपरी ते निगडी हा बीआरटी मार्ग महिनाभरात सुरू करण्याचे नियोजन केले होते. मात्र, पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामुळे पुतळा उद्यानाच्या जवळून ग्रेड सेपरेटरच्या बाजूने बीआरटी लेनमधूनच पीलरसाठी रस्ता खोदला आहे. त्यामुळे खराळवाडीतील लेन तोडली आहे.
आंबेडकर चौक ते मोरवाडीपर्यंत महापालिकेसमोरून मेट्रोचे खांब उभारणार होते. ते खांब आता ग्रेड सेपरेटरच्या बाजूने घेतले जाणार आहे. त्यामुळे अगोदरच अरुंद असणाºया रस्त्यावरील बीआरटी मार्गांतून मेट्रो मार्ग जाणार असल्याने मोरवाडीतून पिंपरीत येण्यास बीआरटीला अडथळा निर्माण होणार आहे. मोरवाडी ते एम्पायर इस्टेट पुलापर्यंतच्या बीआरटी मार्गात खोदाई सुरू केली आहे.

दहा वर्षे रखडला प्रकल्प, मार्गावरच खोदाई
पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी या बीआरटी मार्गाच्या कामाला २००९ मध्ये मंजुरी मिळाली होती. मात्र, एकाच मार्गावर ग्रेड सेपरेटर, बीआरटी आणि सामान्य नागरिकांच्या वाहनांसाठी लेन असल्याने या मार्गावर बीआरटी सुरू करणे अडचणीचे ठरले होते. तसेच या मार्गाचे सेफटी आॅडिट न झाल्याने या मार्गाविरोधात न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यामुळे दहा वर्षे हा प्रकल्प रखडला आहे. या मार्गावर ३६ बस स्थानके उभारण्यात आली आहेत. त्यापैकी २२ स्थानके ही महापालिकेने आणि १४ स्थानके ही बीव्हीजीने उभारली होती. त्यानंतर गेल्या
वर्षी सिग्नल यंत्रणेवरही कोट्यवधींचा खर्च करण्यात आला. बीआरटी लेनचे काम पूर्ण झाल्यानंतर मेट्रोने काम सुरू केले आहे. मेट्रोच्या कामासाठी बीआरटीची लेन आणि दुभाजकही तोडण्यात आले आहेत. केंद्र सरकारचे काम असल्याने महापालिका प्रशासनही या खोदाईकडे दुर्लक्ष करीत आहे. तसेच या मार्गावर काही वर्षांपूर्वीच नव्याने पथदिवे बसविण्यात आले होते. तेही काढण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिकेला मेट्रोचे काम झाल्यानंतर पथदिवे दुरुस्तीचा खर्च करावा लागणार आहे.

Web Title: Metro carrier gets stuck in BRT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.