निगडीपर्यंत मेट्रो?
By Admin | Published: October 15, 2016 03:08 AM2016-10-15T03:08:17+5:302016-10-15T03:08:17+5:30
पुणे मेट्रो प्रकल्पाला सार्वजनिक गुंतवणूक बोर्डाने मंजुरी दिल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रो धावण्याचा मार्ग आता मोकळा झाला
पिंपरी : पुणे मेट्रो प्रकल्पाला सार्वजनिक गुंतवणूक बोर्डाने मंजुरी दिल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रो धावण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रोचा कॉरिडोर दापोडी ते पिंपरीऐवजी निगडीपर्यंत असावा, अशी नागरिकांची आग्रही मागणी आहे.
दरम्यान, यासाठी प्रयत्नशील असल्याचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले. या प्रकल्पाला सार्वजनिक गुंतवणूक बोर्डाने मंजुरी दिली असून, आता केवळ केंद्र सरकारची अंतिम मंजुरी मिळाल्यास प्रकल्पाला सुरुवात होणार आहे.
याबाबत आयुक्त म्हणाले की, मेट्रोच्या चार कॉरिडोरपैकी एक कॉरिडोर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत आहे. तो दापोडी ते पिंपरी असा आहे. मात्र, नागरिकांची मागणी आहे की, हा कॉरिडोर निगडीपर्यंत असावा. त्यामुळे या प्रकल्पात निगडीपर्यंतच्या कॉरिडोरचा समावेश केल्यास अधिक फायदेशीर होईल.
प्रकल्पासाठीचा महापालिकेचा हिस्सा निश्चित झालेला नाही. किती हिस्सा द्यायचा, याबाबत जो निर्णय घेतला जाईल, तो महासभेच्या मान्यतेने द्यावा लागेल. (प्रतिनिधी)