पिंपरी-चिंचवडला मिळाला राज्यमंत्री; लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ अध्यक्षपदी अमित गोरखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 10:19 PM2019-03-12T22:19:26+5:302019-03-12T22:19:42+5:30
पिंपरी-चिंचवड शहराला दुसरा राज्यमंत्री मिळणार? ही प्रतिक्षा संपली असून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी अमित गोरखे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ फेब्रुवारीचे पत्र दिले आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला दुसरा राज्यमंत्री मिळणार? ही प्रतिक्षा संपली असून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी अमित गोरखे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ फेब्रुवारीचे पत्र दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी तरूणांला संधी देऊन विद्यमान आमदारांना चपराक दिल्याची चर्चा राजकीय वतुर्ळात आहे.
राष्टÑवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता असताना पिंपरी-चिंचवडमध्ये कोणतीही पदे दिली गेली नव्हती. मात्र, केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर अमर साबळे यांना राज्यसभा मिळाली होती. तसेच अॅड. सचिन पटवर्धन यांच्या रूपाने राज्यमंत्री दर्जा असणारे पद मिळाले होते. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांची निवड झाली होती. तसेच राज्य शासनाच्या विविध समितींवर जुण्या कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. पंधरा वर्षांत न झालेली प्राधिकरण समिती नियुक्त झाली आहे. अध्यक्षपदानंतर सदस्यांचीही निवड झाली आहे.
नव्या तरूण चेह-यास संधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या राजकारणात लक्ष घातल्याने विविध समितीवर भाजपातील कार्यकर्त्यांना संधी दिली होती. गेल्या दोन वर्षांपासून आणखी एक राज्यमंत्री दर्जाचे पद मिळणार अशी चर्चा होती. आमदार लक्ष्मण जगताप किंवा आमदार महेश लांडगे, आमदार संजय भेगडे यांना मंत्रीपद मिळणार अशी चर्चा होती. लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर महामंडळांची नियुक्ती केली असून. त्यात कलारंग प्रतिष्ठानाचे अध्यक्ष आणि शिक्षण क्षेत्रात कार्य करणाºया अमित गोरखे यांची निवड लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी केली आहे. गोरखे हे कला आणि सांस्कृतिक सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सात फेब्रुवारीचे पत्र गोरखे यांना दिले आहे.
स्थानिक नेत्यांना दणका
पिंपरी-चिंचवडला आणखी एक राज्यमंत्री मिळणार आणि आमदार लक्ष्मण जगताप किंवा आमदार महेश लांडगे, आमदार संजय भेगडे या तिघांपैकी एकालाच मिळणार अशी चर्चा तीन वर्षांपासून होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील गोरखे यांना संधी मिळाल्याने भाजपातील स्थानिक नेत्यांना दणका मिळाला असल्याची चर्चा रंगली आहे. अण्णाभाऊ साठे महामंडळ हे सुमारे साडेसातशे कोटींचा अर्थसंकल्प असणारे मंडळ आहे. ‘विविध समाजपयोगी आणि कल्याणकारी उपक्रम राबविणार असल्याचे गोरखे यांनी सांगितले.