Pimpri Chinchwad | फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 01:13 PM2023-04-17T13:13:26+5:302023-04-17T13:15:02+5:30
पोलिसांनी २८ वर्षीय आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे....
पिंपरी : शरीरसंबंध ठेवण्यासाठी विरोध करणाऱ्या मुलीला फोटो वायरल करण्याची धमकी दिली. त्यासोबतच ती अल्पवयीन असल्याचे माहिती असूनदेखील तिच्यावर अत्याचार केला. ही घटना मे २०२० ते १५ जानेवारी २०२३ या कालावधीत भोसरी, लोहगाव, पुणे येथे घडली. या प्रकरणी १८ वर्षीय तरुणीने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी २८ वर्षीय आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२० मध्ये फिर्यादी ही अल्पवयीन असल्याचे माहिती असूनदेखील आरोपीने फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवले. फिर्यादीने त्याला विरोध केला असता आरोपीने मारहाण करत तसेच फोटो व्हायरल करत बदनामी करण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.