आमदार विधानसभेत ‘ब्र’ही काढत नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 01:29 AM2018-08-30T01:29:30+5:302018-08-30T01:30:15+5:30
दत्ता साने : लक्ष्मण जगताप यांच्यावर टीका; भ्रष्टाचाराला सत्ताधाऱ्यांची साथ असल्याचा आरोप
पिंपरी : पंतप्रधान आवास योजनेतील भ्रष्टाचाराला सत्तारूढ पक्षनेत्याची साथ असल्यानेच ते बेताल वक्तव्य करीत आहेत. भाजपाचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप हे विधानसभेत शहरातील समस्यांबाबत ब्र काढत नाहीत, अशी टीका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आज केली.
अल्प उत्पन्न असणाºया नागरिकांसाठी पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये बोºहाडेवाडी येथील गृहप्रकल्पाचा दर प्रतिचौरस फूट २५०० रुपये, रावेत येथील गृहप्रकल्पाचा दर प्रतिचौरस फूट २७९९ रुपये, तर चºहोली येथील गृहप्रकल्पासाठी प्रति चौरस फूट २८४६ रुपये देण्यात आलेला आहे. पण शहरात बांधकामाचा कमाल दर १२०० ते १४०० इतकाच आहे. महापौरांच्या दालनात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सत्तारूढ पक्षनेत्यांनी पंतप्रधान आवास योजनेच्या गृहप्रकल्पाच्या सल्लागारांनी डीपीआर तयार करून दिला आहे. त्यानुसार बांधकामाचा प्रतिचौरस फुटाचा दर हा १६०० ते १६५० इतका आहे. पार्किंगचे शुल्क धरुन तो एकत्रित दर २७०० चौरस फूट आहे, असे विधान कालच केले आहे, असे साने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शिवसेनेच्या खासदारांनी पालिकेत लक्ष घालू नये असेही वक्तव्य केले आहे. मात्र, तेच भाजपाचे आमदार महापालिकेत मीटिंग घेतात, पत्र देतात, ते खुलेआमपणे शहरातील विकासकामांबाबत अधिकाºयांच्या बैठका घेतात. शहरातील पाणी प्रश्नाबाबत पालिकेत येऊन पत्रकार परिषद घेतात, ते भाजपाला चालते. भाजपाचे आमदार विधानसभेत शहरातील समस्यांबाबत ब्र काढत नाहीत. त्यांनी विधानसभेत शहराचे प्रश्न मांडावेत, असा टोला साने यांनी मारला.
विरोधी पक्षनेत्यांचे बंद झाले तोडपाणी
पिंपरी : पंतप्रधान आवास योजनेच्या निविदाप्रक्रियेवरून भाजपा आणि राष्टÑवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जुंपली आहे. सत्ताधारी आणि प्रशासन एकत्रितपणे दरोडा टाकत आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली होती. त्यास भाजपाचे प्रवक्ते अमोल थोरात यांनी उत्तर दिले आहे. महापालिकेतील पारदर्शक कारभारामुळे विरोधी पक्षनेत्यांचे तोडपाणी बंद झाले आहे. अधिकारी आणि ठेकेदारांना दमबाजी करूनही हातात काहीच पडत नसल्यामुळे त्यांना नैराश्य आले आहे, असे प्रत्युत्तर थोरात यांनी दिले आहे. महापालिकेत पंतप्रधान आवास योजनेच्या निविदाप्रक्रियेवरून भाजपा आणि राष्टÑवादी, शिवसेनेच्या नेत्यांमध्ये जुंपली आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधी पक्षनेते साने यांना थोरात यांनी प्रत्युत्तर दिले आहे.