Lakshman Jagtap: आमदार लक्ष्मण जगताप अनंतात विलीन; पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 06:28 PM2023-01-03T18:28:09+5:302023-01-03T18:28:35+5:30

पिंपरी-चिंचवड शहरातील राजकारणात गेली पस्तीस वर्षे जगताप यांचे वलय

MLA Laxman Jagtap passed away in pimpri chinchwad | Lakshman Jagtap: आमदार लक्ष्मण जगताप अनंतात विलीन; पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Lakshman Jagtap: आमदार लक्ष्मण जगताप अनंतात विलीन; पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

googlenewsNext

पिंपरी : पिंपरी- चिंचवड शहरातील भाजपाचे जेष्ठ नेते, माजी शहराध्यक्ष आणि विद्यमान आमदार लक्ष्मण पाडुरंग जगताप (वय ५९) यांचे बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. पिंपळे गुरव येथील जगताप कुटुंबियांच्या शेतात आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भजन करीत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. जगताप यांच्या निधनाने शहरावर शोककळा पसरली आहे.

यावेळी मंत्री अतुल सावे, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पी एमआर डी ए मुख कार्यकारी अधिकारी राहुल महिवाल, पोलीस आयुक्त विनयकुमर चोबे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार महेश लांडगे, अण्णा बनसोडे, नीलम गोऱ्हे, महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे, खासदार श्रीनिवास पाटील आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहरातील राजकारणात गेली पस्तीस वर्षे जगताप यांचे वलय होते. चार वेळा नगरसेवक, एक वेळा विधानपरिषद सदस्य, तीन वेळा चिंचवडचे आमदार राहिलेले जगताप यांनी पुणे जिल्ह्यातील राजकारणात स्थान निर्माण केले होते. सुरूवातीला २०१४ पर्यंत राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आणि २०१४ नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक म्हणून भूमिका बजावली होती. भाजपाच्या शहराध्यक्षपदाची सूत्र स्विकारून पिंपरी चिंचवड महापालिकेत २०१७ मध्ये भाजपाची एकहाती सत्ता आणण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. योगदान दिले. तसेच समाजकारण, राजकारण, सहकार, शिक्षण, बांधकाम व्यवसायात त्यांनी योगदान दिले.  

दोन वर्षांपासून आमदार जगताप यांची प्रकृती ठिक नव्हती. एप्रिल २०२२ पासून तब्येत खालावली.  मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कुटुंबियांनी त्यांना उपचारासाठी अमेरिकेत नेले होते. त्यानंतर ३ एप्रिलला पुन्हा पिंपरी- चिंचवडला परतले. दिवाळीत त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि भाजपाच्या नेत्यांनी कर्करोगावरील उपचारासाठी प्रयत्न केले. प्रबळ इच्छाशक्तीमुळे त्यांनी कर्करोगाशी झुंज दिली. नंतरच्या काळात त्यांची तब्बेत अधिक चिंताजनक होत गेली. मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालविली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्षनेते अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जगताप यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी महापालिकेत नगरसेवक, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, राष्ट्रवादीचे अध्यक्ष, विधानपरिषद आमदार, एक वेळा अपक्ष आमदार, भाजपाचे शहराध्यक्ष आणि दोन वेळा भाजपा आमदार म्हणून काम केले होते. 

Web Title: MLA Laxman Jagtap passed away in pimpri chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.