Pimpri Chinchwad | एसटीने प्रवास करीत आमदारांनी जाणून घेतल्या महिलांच्या समस्या

By विश्वास मोरे | Published: March 20, 2023 04:58 PM2023-03-20T16:58:14+5:302023-03-20T16:58:40+5:30

दोन्ही महिला आमदारांनी सोमवारी सकाळी वल्लभनगर आगारातून लालपरीने प्रवास केला...

MLAs ashwini jagtap uma khapare came to know the problems of women while traveling to ST | Pimpri Chinchwad | एसटीने प्रवास करीत आमदारांनी जाणून घेतल्या महिलांच्या समस्या

Pimpri Chinchwad | एसटीने प्रवास करीत आमदारांनी जाणून घेतल्या महिलांच्या समस्या

googlenewsNext

पिंपरी : राज्य सरकारने एसटी बस प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत दिली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार उमा खापरे आणि अश्विनी जगताप यांनी सोमवारी वल्लभनगर आगारापासून ते लोणावळापर्यंत एसटी बसने एसटीने प्रवास केला. महिलांचे प्रश्न जाणून घेतले. त्यानंतर तेथून अधिवशेनास मुंबईला रवाना झाल्या.
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या दोन महिला आमदार आहेत. विधान परिषदेच्या उमा खापरे आणि चिंचवड विधानसभेच्या अश्विनी जगताप या आमदार आहेत. सध्या मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाला जाण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील या दोन्ही महिला आमदारांनी महाराष्ट्रातील सर्वसामान्यांची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या लालपरीला अर्थात एसटीला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या दोन्ही महिला आमदारांनी सोमवारी सकाळी वल्लभनगर आगारातून लालपरीने प्रवास केला.

वल्लभनगर आगार ते लोणावळापर्यंत एसटीने प्रवास करून महिला प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. पिंपरी-चिंचवड भाजपमधील महिला पदाधिकारी व माजी नगरसेविकांनीही सहप्रवासी म्हणून दोन्ही महिला आमदारांसोबत लोणावळापर्यंत प्रवास केला. त्यामध्ये माजी महापौर उषा ढोरे, स्थायी समितीच्या माजी सभापती ममता गायकवाड, माजी नगरसेविका शारदा सोनवणे, निर्मला कुटे, सविता खुळे, वैशाली जवळकर, माधवी राजापुरे, भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा उज्ज्वला गावडे, माजी शहराध्यक्षा शैला मोळक, दिपाली धानोरकर, सुप्रिया चांदगुडे आदींचा समावेश होता.


महिलांना न्याय देणारे राज्य सरकार आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात या सरकारने महिलांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये एसटीने प्रवास करणाºया महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यातून राज्यातील माज्या महिला भगिनींना प्रवास करण्यासाठी मोठा दिलासा मिळालेला आहे.
- अश्विनी जगताप (आमदार)  

 

महिलांना एसटी बसमध्ये ५० टक्के सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला. त्याची अंमलबजावणी केली जात आहे. आज आम्ही अधिवेशनाला जाताना पिंपरी ते लोणावळा असा महिला पदाधिकाऱ्यांसोबत एसटीने प्रवास करून महिला प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. एसटीने प्रवाशांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- उमा खापरे, आमदार

Web Title: MLAs ashwini jagtap uma khapare came to know the problems of women while traveling to ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.