चिखलीतील रेनवा टोळीवर ‘मोका’; पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांचे आदेश

By नारायण बडगुजर | Published: March 31, 2024 03:47 PM2024-03-31T15:47:01+5:302024-03-31T15:47:46+5:30

टोळीच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरी चोरी, चोरी, खंडणी, तोडफोड करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल

Mocca on Renwa tribe in Chikhli Pimpri Chinchwad Police Commissioner order | चिखलीतील रेनवा टोळीवर ‘मोका’; पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांचे आदेश

चिखलीतील रेनवा टोळीवर ‘मोका’; पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांचे आदेश

पिंपरी : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडपोलिसांकडून सराई गुन्हेगारांवर कारवाई केली जात आहे. त्यात चिखलीतील रेनवा टोळीवर ‘मोकां’तर्गत कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी याबाबतचे आदेश दिले.

चिखली पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील तपासामध्ये टोळी प्रमुख नीलेश पुखराज रेनवा (२७, रा. टॉवर लाईन, म्हेत्रे वस्ती, चिखली), रोहन कमलाकर कावळे (२९, रा. नेवाळे वस्ती, चिखली), दत्तात्रय संतोष शिंदे (२३, रा. मोरे वस्ती, चिखली), सुमित विलास क्षिरसागर (२०, रा. ताराबाई चौक, शिवकृपा कॉलनी, मोरे वस्ती, चिखली) यांच्यासह विधी संघर्षीत दोन बालक यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकूण सात गुन्हे केल्याची नोंद आढळून आली. त्यांच्या विरोधात चिखली, वाकड पोलिस ठाण्यांच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरी चोरी, चोरी, खंडणी, तोडफोड करणे, बेकायदेशीररित्या जिवघेणी हत्यार जवळ बाळगणे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.  

टोळीमधील सदस्यांनी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवून संघटीतपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अतंर्गत कारवाई करण्याबाबत प्रस्ताव पोलिस आयुक्‍त कार्यालयाकडे सादर केला. प्रस्तावामधील कागदपत्रांची छाननी करून या गुन्ह्यामध्ये आणखी काही कलमांचा अंतर्भाव करण्याचे आदेश अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांनी पारीत केले.  

पोलिस आयुक्‍त विनय कुमार चौबे, अपर आयुक्‍त वसंत परदेशी, गुन्हे शाखेचे उपायुक्त संदीप डोईफोडे, परिमंडळ तीनचे उपायुक्‍त शिवाजी पवार, सहायक पोलिस आयुक्‍त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदशनाखाली चिखलीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, पोलिस निरीक्षक अनिल देवडे, तसेच पोलिस अंमलदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.     

तीन महिन्यांत सात टोळ्यांमधील ३६ गुन्हेगारांना दणका

लोकसभा निवडणूक भयमुक्त व पारदर्शक व नि:पक्षपातीपणे पार पाडता यावी यासाठी पोलिस आयुक्‍त विनय कुमार चौबे यांनी प्रतिबंध कारवाईचा आराखडा तयार केला आहे. दरम्यान, पोलिस आयुक्त चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली जानेवारी ते मार्च २०२४ या तीन महिन्यांच्या कालावधीत पिंपरी - चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील सात संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील एकूण ३६ गुन्हेगारांवर ‘मोका’ कायद्यांतर्गत कारवाई झाली.  

Web Title: Mocca on Renwa tribe in Chikhli Pimpri Chinchwad Police Commissioner order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.