विवाहांना ‘मॉर्डन लूक’, पत्रिका झाल्या डिजिटल; पारंपरिक वाद्यांना आले ‘अच्छे दिन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 02:59 AM2018-04-07T02:59:46+5:302018-04-07T02:59:46+5:30

सध्या शहरात ठिकठिकाणी लगीनघाई दिसून येत आहे. मात्र आता विवाह सोहळ्यांचे स्वरूप बदलत आहे. सध्याचे विवाह सोहळ्यांना ‘मॉर्डन लूक’ देण्यात येत असल्याचे दिसून येते.

 'Modern Look' for Marriages | विवाहांना ‘मॉर्डन लूक’, पत्रिका झाल्या डिजिटल; पारंपरिक वाद्यांना आले ‘अच्छे दिन’

विवाहांना ‘मॉर्डन लूक’, पत्रिका झाल्या डिजिटल; पारंपरिक वाद्यांना आले ‘अच्छे दिन’

Next

निगडी - सध्या शहरात ठिकठिकाणी लगीनघाई दिसून येत आहे. मात्र आता विवाह सोहळ्यांचे स्वरूप बदलत आहे. सध्याचे विवाह सोहळ्यांना ‘मॉर्डन लूक’ देण्यात येत असल्याचे दिसून येते.
लग्नाचे निमंत्रण मित्रांना, नातलगांना, पाहुण्यांना देण्यासाठी लग्न पत्रिका काढली जाते. पूर्वी लग्न पत्रिकेत ज्यांच्या घरात लग्न आहे त्यांची व भावकीची नावे व मामांचे नाव दिसत असे़ साध्या पत्रिका छापल्या जायच्या परंतु काळाच्या ओघात पत्रिकेचे स्वरूप बदलले आहे. सध्या सोशल मीडियावरून फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर निमंत्रण पत्रिकेची सॉफ्ट कॉपी पाठवली जात आहे.
अगदी १० ते ३०० रुपयांपर्यंत एक पत्रिका मिळत आहे. पत्रिकेत नावे मावेनासी होत आहेत. त्यामुळे याला पर्याय शोधण्यात येत आहे. डिजीटल पत्रिका त्यासाठी वापरण्यात येत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही पत्रिका आप्तेष्ट, मित्रमंडळी आदींपर्यंत पोहोचविण्यात येते.
सध्या कडक उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे. दुपारच्या साखरपुडा कार्यक्रमासाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी विविध प्रकारच्या फळाच्या थंडगार पेयाची सोय केली जात आहे. यानंतर दुपारी पाहुण्याच्या मनोरंजनासाठी आॅर्केस्ट्रा ही ठेवण्यात येत आहे. लग्न असो वा इतर कोणतेही कार्य जेवणासाठी पंगत असे मात्र सध्या पंगतीची जागा बुफेने घेतले आहे. पिण्यासाठी साधे पाणी देणे ही पद्धत बंद झाली आहे. २००, ५०० मिली लिटरच्या पाण्याच्या बाटल्या वाटल्या जात आहेत.

ढोल, हलगी पथक, उंट, हत्ती मिरवणुकीचे आकर्षण
लग्न समारंभात वराची मिरवणुकीसाठी लाखो रुपये खर्च केले जात आहे. डॉल्बी, बँड पथक, ढोल पथक, हलगी पथक, उंट, हत्ती हे मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरत आहे. छायाचित्राचे पूर्वी अप्रूप असायचे आत्ता डिजिटल, एचडी ड्रोन कॅमेºयाच्या साह्याने चित्रीकरण केले जात आहे.
पत्रिकेत आप्तेष्टांच्या नावापेक्षा राजकारण्यांच्या नावांची मांदियाळी दिसत आहे. शेकडो निमंत्रक, शेकडो स्वागतोत्सक, शेकडो कार्यवाहक, मित्रपरिवार यांची नावे पत्रिकेत झळकत आहेत. पत्रिकेत नावापुढे पदाला देखील महत्त्व दिले जात आहे. ज्या पत्रिकेत नाव आहे अशाच लग्नाला नेते मंडळी जात आहेत. ज्या पत्रिकेत नाव नाही त्या लग्नाला टाळले जात आहे.

Web Title:  'Modern Look' for Marriages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.