पिंपरी-चिंचवडमध्ये १७ वर्षीय मुलाकडून अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे; Video शूट करून विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 14:58 IST2022-03-22T14:52:20+5:302022-03-22T14:58:50+5:30
मोठमोठ्या हाॅटेलचे तसेच चारचाकी वाहनाचे फोटो दाखवून अल्पवयीन मुलीला प्रभावित केले

पिंपरी-चिंचवडमध्ये १७ वर्षीय मुलाकडून अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे; Video शूट करून विनयभंग
पिंपरी : अल्पवयीन मुलाने इंस्टाग्रामवरून ओळख करून अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केले. त्याचे शुटिंग करून मुलीचा विनयभंग केला. तसेच तिच्या वडिलांना मारण्याची धमकी दिली. रहाटणी व पिंपळे सौदागर येथे फेब्रुवारी २०२१ ते २१ मार्च २०२२ या कालावधी ही घटना घडली. पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी सोमवारी (दि. २१) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी १७ वर्षीय मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विधीसंघर्षीत बालकाने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीबरोबर इंन्स्ट्रग्राम या ॲपवरून मैत्री केली. मोठमोठ्या हाॅटेलचे तसेच चारचाकी वाहनाचे फोटो दाखवून अल्पवयीन मुलीला प्रभावित केले. तिच्याबरोबर जवळीक साधून भेटण्याच्या बहाण्याने फिर्यादीच्या घरी आला. तसेच अल्पवयीन मुलीला मारण्याची व फिर्यादीला बरेवाईट करण्याची धमकी दिली.
अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळ करून त्याचे मोबाईल फोनमध्ये शुटींग करून अल्पवयीन मुलीच्या मनास लज्जा उत्पन्न करून तिचा विनयभंग केला, असे फिर्यादीत नमूद आहे. सहायक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे तपास करीत आहेत.