लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; मुलगी गर्भवती राहिल्यानंतर प्रकार उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 11:57 AM2023-03-01T11:57:28+5:302023-03-01T11:58:11+5:30
लैंगिक अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती...
पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. त्यात ती गर्भवती राहिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार २ ते २७ जानेवारी या कालावधीत कासारवाडी, चिंचवड येथे घडला. पृथ्वीराज जाधव (वय २०, रा. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने सोमवारी (दि. २७) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या १६ वर्षीय मुलीसोबत पृथ्वीराज याने सोशल मीडियावर मैत्री केली. मुलीचा विश्वास संपादन करून तिला आकुर्डी रेल्वे स्टेशन येथे बोलावून घेतले. त्यानंतर तिला रूमवर नेले आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यात मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. भोसरी पोलिस तपास करीत आहेत.