Pune Crime | बोपखेलमध्ये भाडेकरूकडून प्लॅट मालकीणीचा विनयभंग; दोघांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 12:23 IST2023-01-18T12:22:54+5:302023-01-18T12:23:32+5:30
मालकीणीला शिवीगाळ करत तिच्याशी गैरवर्तन करून विनयभंग...

Pune Crime | बोपखेलमध्ये भाडेकरूकडून प्लॅट मालकीणीचा विनयभंग; दोघांविरोधात गुन्हा दाखल
पिंपरी : भाडे मागण्यासाठी गेलेल्या प्लॅट मालकीणीला शिवीगाळ करत तिच्याशी गैरवर्तन करून विनयभंग करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि.१६) बोपखेल येथे घडली. याप्रकरणी ३१ वर्षीय महिलेने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी दोघा जणांवर गुन्हा दाखल केला असून, एकाला अटक केली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या प्लॅटचे भाडे मागण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, आरोपींनी संगनमत करून फिर्यादीस अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली, तसेच आरोपीने फिर्यादीशी गैरवर्तन करून मनात लज्जा उत्पन्न होईल, अशी कृती केली. असे फिर्यादीत नमूद आहे.