लग्नाचे आमिष दाखवून गायिकेवर बलात्कार; फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची आरोपीची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 12:46 PM2021-10-18T12:46:35+5:302021-10-18T12:50:58+5:30

पिंपरी : बँड व ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमात गायिका म्हणून काम करणाऱ्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. त्याचे फोटो व ...

molestation on singer woman pimpri chinchwad crime news | लग्नाचे आमिष दाखवून गायिकेवर बलात्कार; फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची आरोपीची धमकी

लग्नाचे आमिष दाखवून गायिकेवर बलात्कार; फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची आरोपीची धमकी

Next

पिंपरी : बँड व ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमात गायिका म्हणून काम करणाऱ्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. त्याचे फोटो व व्हिडीओ काढून बदनामी करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केले. तसेच पतीसही जीवे मारण्याची धमकी दिली. हिंजवडी व चिंचवड स्टेशन येथे २०१९ पासून १७ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.

पीडित ४२ वर्षीय महिलेने याप्रकरणी रविवारी (दि. १७) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. बाळू शिवाजी गव्हाळे (वय ५५, रा. लांडेवाडी झोपडपट्टी, भोसरी) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीडित महिला बँड व आर्केस्ट्राच्या कार्यक्रमांमध्ये गायिका म्हणून काम करतात. आरोपी बाळू गव्हाळे याचे बँड पथक आहे. आरोपीने फिर्यादीला गायिका म्हणून काम करण्यास घेतले. त्यानंतर फिर्यादीशी जवळीक वाढवली. ऑगस्ट २०१९ मध्ये आरोपीने फिर्यादीला कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलावून घेऊन हिंजवडी येथील एका लॉजमध्ये नेले. तेथे फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले.

त्यावेळी त्याचे फोटो व व्हिडिओ काढला. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला बदनामी करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केले. तसेच अनेकवेळा अनेक लॉजवर व त्याच्या चिंचवड स्टेशन येथील ऑफिसमध्ये व हिंजवडी येथे अनेकवेळा घेऊन जाऊन फिर्यादीवर बलात्कार केला. तसेच फिर्यादीच्या पतीसही जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित महिलेने याप्रकरणी भोसरी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार, भोसरी पोलिसांनी फिर्याद नोंदविली असून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.

Web Title: molestation on singer woman pimpri chinchwad crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.