ठेकेदाराने महिलेचा निर्जनस्थळी नेत केला विनयभंग; तळवडे येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 16:50 IST2021-02-18T16:49:17+5:302021-02-18T16:50:00+5:30
या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल

ठेकेदाराने महिलेचा निर्जनस्थळी नेत केला विनयभंग; तळवडे येथील घटना
पिंपरी : ठेकेदाराने एका महिलेला निर्जनस्थळी नेऊन विनयभंग केला. त्याचे चित्रिकरण साथीदाराने केल्याची घटना तळवडे स्मशानभूमी जवळ घडली. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
नवनाथ आटपाडकर, नरेश चौधरी ( दोघे, रा. गायकवाड वस्ती, कुरुळी, चाकण) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. एका महिलेने फिर्याद दिली आहे. पीडित महिला हाऊस किपींग कामगार पुरविण्याचे काम करते. त्याचे पैसे घेण्यासाठी संबंधित १६ फेब्रुवारी रोजी महिला गेली होती. आरोपींनी त्यांना दुचाकीवर बसविले.
चिखलीतील तळवडे गावठाण स्मशानभूमीजवळ गाडी नेली. निर्जन परिसर असल्याने फिर्यादींनी पुढे जाण्यास नकार दिला. गाडी थांबविली नाही तर गाडीवरुन उडी मारण्याची धमकी दिल्यानंतर दुचाकी थांबविली.
आरोपी आटपाडकर याने चौधरीला संबंधित महिलेशी खासगी बोलायचे असल्याचे सांगून थोडे दूर थांबण्यास सांगितले. चौधरी दूर गेल्यानंतर आटपाडकर याने महिलेस मिठी मारली. तिने मदतीसाठी चौधरीला बोलावले. स्वत:ची सुटका करुन घेतली. त्या नंतर चौधरी याने महिलेला फोन करुन मी लांबून तुमचा व्हिडीओ बनवला आहे. तू कोणाला काही सांगू नको अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.