Pune Crime| महिलेला चपलेने मारून विनयभंग; २३ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 13:55 IST2022-10-05T13:40:24+5:302022-10-05T13:55:22+5:30
ही घटना ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास पिंपरी येथे घडली...

Pune Crime| महिलेला चपलेने मारून विनयभंग; २३ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल
पिंपरी : महिलेच्या घरात विनापरवानगी येऊन तिला चपलेने मारहाण करून चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून विनयभंग करण्यात आला. ही घटना ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास पिंपरी येथे घडली.
या प्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. ३) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी २३ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आराेपी हा फिर्यादीचा मित्र आहे. तो विनापरवानगी फिर्यादीच्या घरी आला.
फिर्यादी यांनी आरोपीत झालेल्या वादातून आरोपीने चपलेने फिर्यादीला मारहाण केली. त्याला फिर्यादीने आडवण्याचा प्रयत्न केला असता चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून आरोपीने विनयभंग केला, असे फिर्यादीत नमूद आहे.