पावसाळ्यापूर्वीची नाले स्वच्छता
By admin | Published: June 2, 2016 12:28 AM2016-06-02T00:28:33+5:302016-06-02T00:28:33+5:30
येथील नाले महापालिकेतर्फे नुकतेच स्वच्छ करण्यात आले. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करून नागरिकांना आश्चर्यचकित केले आहे.
निगडी : येथील नाले महापालिकेतर्फे नुकतेच स्वच्छ करण्यात आले. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करून नागरिकांना आश्चर्यचकित केले आहे.
नालेसफाईसाठी महापालिकेने निविदा काढावी. पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाल्याची स्वच्छता व्हावी, अशी मागणी विविध संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीने महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे केली जात आहे.
मात्र, निगडी येथील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्वत:हून पुढाकार घेत या परिसरातील नाले स्वच्छ केले. तेथील घाण आणि कचरा बाहेर काढून विल्हेवाट लावली. नाल्याभोवती वाढलेली झाडेझुडपी काढून टाकली. नाल्यातील माती
दगड बाहेर काढून सांडपाण्याला
वाट काढून दिली. त्यामुळे
सांडपाणी तुंबून न राहता पुढे
वाहून जात आहे. सांडपाण्याला वेग आल्याने नाल्याजवळील दुर्गंधी कमी झाली आहे.
कर्मचाऱ्यांच्या या कामामुळे त्यांना महापालिकेचे पुरस्कार मिळाले आहेत. कर्मचाऱ्यांच्या या तत्परतेचे परिसरात कौतुक होत आहे. महापालिकेच्या प्रशासकीय सुधारणा व गतिमानता अभियानांतर्गत १० कलमी कार्यक्रमात विविध विभागांमध्ये प्रभाग स्तर, महापालिका स्तर व प्रशासकीय स्तर प्रोत्साहनपर स्पर्धा घेते. यामध्ये निगडी
हिंदू स्मशानभूमीला प्रथम क्रमांक व ५० हजार रुपये आणि
मुस्लिम दफनभूमीला द्वितीय क्रमांकाचे ३० हजार रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. नगरसेविका अश्विनी चिखले यांनी आरोग्य विभागाचे अभिनंदन केले. (वार्ताहर)