Pune: रहाटणीत मायलेकींनी घेतला गळफास, राहत्या घरात केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 17:42 IST2021-12-18T17:39:54+5:302021-12-18T17:42:23+5:30
बेडचा दरवाजा तोडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला

Pune: रहाटणीत मायलेकींनी घेतला गळफास, राहत्या घरात केली आत्महत्या
पिंपरी : मायलेकींनी राहत्या घरात ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सज्जनगड कॉलनी, रहाटणी येथे शनिवारी (दि. १८) सकाळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सुनीता युवराज नवले (वय ३६), श्रावणी युवराज नवले (वय १३, रा. सज्जनगड कॉलनी, रहाटणी), असे आत्महत्या केलेल्या मायलेकींचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सुनीता यांचे पती युवराज नवले हे रात्री दोनच्या सुमारास घरी आले. त्यावेळी घरातील सर्वजण गप्पा मारत होते. त्यानंतर युवराज नवले हे टेरेसवर झोपण्यासाठी गेले. सुनीता आणि मुलगी श्रावणी यांनी बेडरूममध्ये ओढणीच्या साह्याने गळफास घेतला.
युवराज यांचा मुलगा स्वराज (वय १०) याने सकाळी बेडरूमचा दरवाजा वाजवला. मात्र, प्रतिसाद आला नाही. त्यामुळे मुलाने टेरेसवरून वडिलांना बोलावून आणले. त्यांनी बेडचा दरवाजा तोडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.