पिंपरीमध्ये महापालिकेच्या विरोधात मनसेकडून तिरडी आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 07:14 PM2018-07-30T19:14:52+5:302018-07-30T19:15:39+5:30

महापालिकेच्या परिसरातील स्मशानभूमींच्या दुरावस्थेच्या निषेधार्थ महापालिकेच्या विरोधात तिरडी आंदोलन करण्यात आले.

movement against municipal corporation in Pimpri | पिंपरीमध्ये महापालिकेच्या विरोधात मनसेकडून तिरडी आंदोलन 

पिंपरीमध्ये महापालिकेच्या विरोधात मनसेकडून तिरडी आंदोलन 

Next
ठळक मुद्देतक्रार दाखल करून देखील महापालिका प्रशासन बघ्याच्या भूमिकेत

पिंपरी चिंचवड : पिंपरी, चिंचवड, भोसरी परिसरातील स्मशानभूमींच्या दुरावस्थेच्या निषेधार्थ महापालिकेच्या विरोधात तिरडी आंदोलन करण्यात आले. मनसे कार्यकर्त्यांनी आयुक्त व भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला. निगडी स्मशानभूमीमधील विद्युत दाहिनी १५ वर्षापूर्वीची असून तिच्या वापरण्याची काल मर्यादा १० वर्ष इतकीच आहे. त्यामुळे मागील तीन वर्षांपासून ती बदलण्याची मागणी करत आहे. प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत बघ्याची भूमिका घेत आहे. गेले खुप दिवसापासुन ही विद्युत दाहिनी कधी चालु तर कधी बंद असते. त्यामुळे नागरिकांना सातत्याने त्रास सहन करावा लागत आहे.
वडमुखवाडी येथील स्मशानभूमीचा असून हा प्रश्न गेली २२ वर्षांपासून तसाच प्रलंबित राहिला आहे. स्मशानभूमी नसल्याने नागरिकाना चार ते पाच किमीचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे या भागातील प्रेतात्म्याची होणारी हेळसांड कायम आहे.चिंचवडगाव येथील गेली १० वर्ष झाली प्रलंबित असलेली स्मशानभूमीमुळे रहिवाशांना हक्काची स्मशानभूमी नाही. सर्व ग्रामस्थांना नाईलाजास्तव दुसऱ्या गावात जाऊन अंत्यविधी करावा लागतो.
जुनी सांगवीत देखील वेगळी परिस्थिती नाही.तिथे देखील नागरिकांना ऊन, पाऊस डोक्यावर घ्यावा लागत आहे. कारण आरसीसी शेडच नाही. वारंवार पत्र देईन देखील अद्याप काम नाही. स्थापत्य विभागाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष व गटनेते सचिन चिखले यांच्या नेतृत्वात्खाली हे तिरडी ओदोलन केले.

Web Title: movement against municipal corporation in Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.