अल्फा लावलमध्ये आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 02:50 AM2017-08-04T02:50:49+5:302017-08-04T02:50:49+5:30

कासारवाडी येथील अल्फा लावल कंपनीने २०१३ मध्ये कामावरून काढलेल्या ४०२ कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे

Movement in Alpha Laval | अल्फा लावलमध्ये आंदोलन

अल्फा लावलमध्ये आंदोलन

googlenewsNext

पिंपरी : कासारवाडी येथील अल्फा लावल कंपनीने २०१३ मध्ये कामावरून काढलेल्या ४०२ कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे, या मागणीसाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने कंपनीच्या प्रवेशद्वारावर गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले. कंपनी प्रशासनाने चर्चेची तयारी दर्शविल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
अल्फा लावल कंपनीमध्ये हे कंत्राटी कामगार गेली पंधरा वर्षांपासून काम करत होते. थेट उत्पादन प्रक्रियेत या कामगारांचा समावेश होता. २०१३ मध्ये या कमगारांनी राष्ट्रीय श्रमिक आघाडी या संघटनेचे सभासदत्व स्वीकारले. तसेच कायम सेवेत रुजू करावे, यासाठी कंपनी प्रशासनाकडे मागणी केली. या कारणांमुळे कंपनी प्रशासनाने एकूण ४०२ कामगारांना १ आॅक्टोबर २०१३ पासून कामावर मज्जाव केला. या नंतर या कामगारांनी वेळोवेळी उपोषण आणि आंदोलने केली. मात्र, प्रशासनाने याची दखल घेलती नाही. कामगार उप आयुक्तांनी बोलविलेल्या बैठकीसदेखील कंपनी प्रशासनाचे अधिकारी उपस्थित राहिले नाहीत, अशी माहिती राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी दिली.
आजच्या आंदोलनाला प्रशासनाकडून काही प्रतिसाद मिळाला नाही, तर कंपनीत थेट प्रवेश करण्याच्या पवित्र्यात आंदोलनकर्ते होते. पोलीस फौजफाटाही तैनात ेकेला होता. मात्र, कंपनी प्रशासनाच्या अधिकाºयांनी यशवंत भोसले व आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.

 

Web Title: Movement in Alpha Laval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.