गुन्हेगारी वर्चस्वाच्या हालचाली

By admin | Published: April 17, 2017 06:41 AM2017-04-17T06:41:18+5:302017-04-17T06:41:18+5:30

महापालिकेतील १५ वर्षांची राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उलथवून टाकली. महापालिकेत सत्ता आणण्यासाठी कट्टर विरोधक असणाऱ्यांना बरोबर घेतले

Movement of crime | गुन्हेगारी वर्चस्वाच्या हालचाली

गुन्हेगारी वर्चस्वाच्या हालचाली

Next

पिंपरी : महापालिकेतील १५ वर्षांची राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उलथवून टाकली. महापालिकेत सत्ता आणण्यासाठी कट्टर विरोधक असणाऱ्यांना बरोबर घेतले. वाट्टेल ते करून सत्तेचे समीकरण जुळविण्यात यशस्वी ठरल्यानंतर राजकीय वर्चस्व सिद्ध केलेल्या नेत्यांना आता शहरात गुन्हेगारीतील वर्चस्व दाखवून
द्यायचे आहे. त्यासाठी वेगवान हालचाली सुरू झाल्या असून, त्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी त्यांनी ठेवली आहे. त्यातून घातपाताची मोठी घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून अनेकांनी फेब्रुवारी २०१७च्या अगोदर भाजपात प्रवेश केला. नगरसेवक होण्याची इच्छा बाळगलेल्यांनी उमेदवारी मिळावी म्हणून प्रवेश केला, तर काहींनी व्यावसायिक समीकरणे जुळवून प्रवेश केला. ज्यांना संरक्षणाची गरज होती, त्यांनी आश्रय म्हणून भाजपाप्रवेशाचा मार्ग निवडला. जमीन खरेदी-विक्री व्यवसाय, त्यात कायदा-नियमांनाबगल देऊन केलेली कामे अशा गोष्टींना अभय मिळावे म्हणून एक प्रकारची तडजोड
स्वीकारून काहीजण भाजपात आले आहेत. भाजपात प्रवेश न केल्यास सत्ता आल्यानंतर अडचण येऊ शकते, या भीतीने भाजपामध्ये आलेले अनेकजण आहेत.
सत्ताबदल झाल्यानंतर आपला दोन नंबरचा व्यवसाय अडचणीत येऊ शकतो,या भीतीने आणि त्या व्यवसायास अभय मिळावे या उद्देशाने भाजपात दाखल झालेल्यांमध्ये काही दिग्गजांचाही समावेश आहे. अशा दिग्गजांमुळे राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यात यशस्वी ठरलेले नेते अद्याप स्वत:ला ‘जो जिता वही सिकंदर’ मानण्यास तयार नाहीत. गुन्हेगारी क्षेत्रात वलय निर्माण केलेल्या दिग्गजांपुढे त्यांचे राजकीय वर्चस्व झाकोळत आहे.
महापालिकेत कोणत्या भागातून किती नगरसेवक निवडून आणले, किती ताकत पणाला लावली. महापालिकेवर एकहाती सत्ता आणली. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची वाहवा मिळवली, तरी गुन्हेगारी क्षेत्रात ज्यांचा दबदबा आहे, त्यांना दबकूनच वावरावे लागते, ही खंत त्यांना बोचते आहे. जमीन खरेदी-विक्रीत उलटसुलट व्यवहार करून भाजपाच्या आश्रयाला गेलेल्यांबद्दल काहींच्या मनात रोष आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Movement of crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.