खिळेमुक्त झाडे अभियानाची झाली चळवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 02:37 AM2018-06-13T02:37:18+5:302018-06-13T02:37:18+5:30
मागील चार महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड भागात खिळेमुक्त झाडे अभियानाने यशस्वीपणे जोर धरला आहे. याचाच एक भाग म्हणजे ‘अंघोळीची गोळी’ आणि ‘शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने गिरिराज हौसिंग सोसायटी, बिजलीनगर येथे ‘खिळेमुक्त झाडे’ उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
पिंपरी - मागील चार महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड भागात खिळेमुक्त झाडे अभियानाने यशस्वीपणे जोर धरला आहे. याचाच एक भाग म्हणजे ‘अंघोळीची गोळी’ आणि ‘शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने गिरिराज हौसिंग सोसायटी, बिजलीनगर येथे ‘खिळेमुक्त झाडे’ उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
शहर परिसरात ही खिळेमुक्त झाडे अभियानाची चौथी शाखा आहे. निगडी, संभाजीनगर, थेरगाव यानंतर बिजलीनगर येथेही सुरू झालेले हे अभियान संपूर्ण बिजलीनगर येथील झाडे खिळेमुक्त, कचरामुक्त आणि आळीयुक्त करूनच पूर्ण होईल. या उपक्रमांतर्गत पर्यावरण रक्षण करणाऱ्या निसर्गप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळाला. येथील सहभागी नागरिकांनी असंख्य झाडांना वेदनामुक्त केले.
निगडी प्राधिकरण परिसरामध्ये खिळेमुक्त झाड हा उपक्रम राबविण्यात आला. या माध्यमातून अनेक झाडांचे खिळे काढण्यात आले. झाडांना मोकळा श्वास घेता येईल यासाठी प्रयत्न करण्यात आले.
अनेक ठिकाणी झाडांवर जाहिरात फलक लावण्याचे फॅड वाढले आहेत. बºयाच वेळा फलक काढले जातात परंतु झाडे खिळेमुक्त केले जात नाहीत. त्यामुळे झाडांचे आयुर्मान कमी होऊन पर्यावरणाला धोका निर्माण होत होता. याची दखल घेऊन अनेक संघटनांनी खिळेमुक्त झाड हा उपक्रम सुरू केला. निगडी, संभाजीनगर, थेरगाव यानंतर बिजलीनगर येथेही सुरू झालेले हे अभियान संपूर्ण बिजलीनगर येथील झाडे खिळेमुक्त, कचरामुक्त आणि आळीयुक्त करूनच पूर्ण होईल, असे यामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी सांगितले.
या वेळी पिंपरी-चिंचवड महापालिका ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय, शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन, बिजलीनगर ज्येष्ठ नागरिक संघ, बिजलीनगर हास्य क्लब या सहकारी सामाजिक संस्थांनी आपला कृतिशील सहभाग नोंदविला.
या वेळी ‘अ’ प्रभाग कार्यालयाच्या अध्यक्षा नगरसेविका अनुराधा गोरखे, ‘ब’ प्रभाग कार्यालयाच्या अध्यक्षा व स्थायी समिती सदस्य करुणा चिंचवडे, नगरसेविका शर्मिला बाबर, राजेंद्र बाबर, शेखर चिंचवडे, व्यापारी आघाडी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष राजेंद्र चिंचवडे, प्रभाग अधिकारी संदीप खोत, आरोग्याधिकारी एम. एम. शिंदे, आनंद पानसे, केतकी नायडू, प्राजक्ता रुद्रवार, मनीषा शिंदे, उल्हास टकले, प्रतापसिंग पाटील, रोहित शेणॉय, सिकंदर घोडके, राहुल धनवे, गणेश बोरा आदी उपस्थित होते.
शहरात पवना नदी जलपर्णीमुक्त करण्याचा उपक्रमही सुरू करण्यात आला आहे. त्यामध्येही नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. तसेच विविध संघटनांच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये अनेक समाजोपयोगी कामे केली जात आहेत. त्यामुळे शहरात पर्यावरणाचे संतुलन रहात आहे, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
एक झाड टिकल्यामुळे तेथील जैव-विविधता टिकून राहते. तेथे अनेक पक्षी, प्राणी येतात आणि पर्यावरणाचा समतोल राखला जातो. त्यामुळे ट्री अॅक्ट १९७५ नुसार झाडांवर जाहिरात ठोकणाºयावर आणि संबंधित जाहिरात मालकावर येथून पुढे गुन्हे दाखल केले जातील. तसेच ‘ब’ प्रभागातील झाडांवर खिळे ठोकून झाडांना विद्रूप करणाºया आणि त्यांना नुकसान पोहोचवणाºया प्रत्येकावर कडक आणि दंडात्मक कायदेशीर कारवाई केली जाईल वेळ प्रसंगी खटलाही भरला जाईल.
- करुणा चिंचवडे, ब प्रभाग अध्यक्षा