शासनाने दुकाने सुरू करण्यास परवानगी द्या तसेच आर्थिक मदत करावी; नाभिक समाजबांधवांकडून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 02:55 PM2020-06-09T14:55:32+5:302020-06-09T14:59:58+5:30

केशकर्तनालये बंद असल्याने हातावर पोट असलेल्या नाभिक समाजबांधवांचे हाल होत आहेत.

Movement of Nucleus society by wearing PPE kit for permission open saloon shop | शासनाने दुकाने सुरू करण्यास परवानगी द्या तसेच आर्थिक मदत करावी; नाभिक समाजबांधवांकडून आंदोलन

शासनाने दुकाने सुरू करण्यास परवानगी द्या तसेच आर्थिक मदत करावी; नाभिक समाजबांधवांकडून आंदोलन

Next
ठळक मुद्देकेशकर्तनालये सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणीशासन व प्रशासनाच्या निर्णयाचा विरोध करून निषेध

पिंपरी : केशकर्तनालये सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी तसेच आम्हाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी नाभिक समाजबांधवांनी केली आहे. त्यासाठी चिखली येथील कृष्णानगर चौकात स्पाईन रस्त्यावर मंगळवारी (दि. ९) त्यांच्याकडून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. 
महाराष्ट्रात लॉकडाऊन शिथील करण्यात आला असून, टप्प्याटप्प्याने व्यवहार पूर्ववत करण्यात येत आहेत. त्यासाठी उद्योग-व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र केशकर्तनालये, स्पा आदींना परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे नाभिक समाजबांधवांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे केशकर्तनालये सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे. याबाबत पिंपरी-चिंचवडच्या अपर तहसीलदार यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. मंडळाचे अध्यक्ष समाधान गवळी, सेक्रेटरी अनंत पवार, कार्याध्यक्ष देवेंद्र जगताप, उपाध्यक्ष परमेश्वर शिंदे, खजीनदार सुनील बिडकर, मंडळाच्या दक्षता समितीचे अध्यक्ष जितेंद्र शर्मा, मंडळाचे पिंपरी-चिंचवड युवक अध्यक्ष पंकज व्यवहारे आदी या वेळी उपस्थित होते. 
चिखली येथील श्री संत सेनामहाराज नाभिक समाज मंडळाच्या वतीने कृष्णानगर येथे स्पाईन रस्त्यावर भाजी मंडई चौकात आंदोलन करण्यात आले. पीपीई किट परिधान करून हातात मागण्यांचे फलक धरून आंदोलन केले. या वेळी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. शासन व प्रशासनाच्या निर्णयाचा विरोध करून निषेध करण्यात आला. केशकर्तनालये बंद असल्याने हातावर पोट असलेल्या नाभिक समाजबांधवांचे हाल होत आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यांच्यावर आर्थिक संकट आहे. त्यासाठी शासनाने नाभिक समाजबांधवांना आर्थिक मदत करावी, तसेच केशकर्तनालये सुरू करण्यास त्वरित परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली.
मंडळाचे अध्यक्ष समाधान गवळी या वेळी म्हणाले, ह्यह्यपिंपरी-चिंचवड शहरात साडेचार हजारावर व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडून केशकर्तनालये सुरू झाल्यानंतर पुरेशी खबरदारी घेण्यात येईल. दोन खुर्च्यांमध्ये अंतर ठेवण्यात येईल, रुमाल तसेच इतर साहित्याचा एका ग्राहकासाठी एकदाच वापर केला जाईल. त्यासाठी ह्ययूज अँड थ्रोह्ण साहित्य वापरण्यात येईल. महाराष्ट्र नाभिक मंडळाकडून राज्यभरात आंदोलन करण्यात आले. त्यानुसार आम्ही देखील आंदोलन केले आहे. शासनाने आमच्या मागण्यांची दखल घ्यावी.ह्णह्ण

Web Title: Movement of Nucleus society by wearing PPE kit for permission open saloon shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.