सणासुदीच्या तोंडावर एमएसआरडीसीचा सर्वसामान्यांच्या पोटावर हातोडा

By admin | Published: October 20, 2016 04:55 PM2016-10-20T16:55:20+5:302016-10-20T16:55:20+5:30

मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ च्या दुतर्फा टपर्‍या, हातगाड्या लावत पोटाची खळगी भरणार्‍यांवर महाराष्ट्र शासनाच्या रस्ते विकास महामंडळाने

MSRDC's general hammer on the belly of celebration | सणासुदीच्या तोंडावर एमएसआरडीसीचा सर्वसामान्यांच्या पोटावर हातोडा

सणासुदीच्या तोंडावर एमएसआरडीसीचा सर्वसामान्यांच्या पोटावर हातोडा

Next

ऑनलाइन लोकमत
लोणावळा : दि. २० (वार्ताहर) - मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ च्या दुतर्फा टपर्‍या, हातगाड्या लावत पोटाची खळगी भरणार्‍यांवर महाराष्ट्र शासनाच्या रस्ते विकास महामंडळाने ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर कारवाई करत त्याच्या पोटावर हातोडा मारला आहे. हे करत असताना संबंधित अधिकार्‍यांनी मोठ्या व्यावसायकांना मात्र अभय दिल्याने अधिकार्‍यांच्या हेतू विषयी संशय व्यक्त होऊ लागला आहे. बुधवारी दि. १९ रोजी ही कारवाई करण्यात आली.
मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ चे रुंदीकरण प्रस्तावित असले तरी अद्याप शासनाकडून खाजगी जागा धारकांशी जागा आरक्षित करणे, चर्चा करुन मोबदला देणे व अन्य बाबीं संदर्भात कसलाही पत्रव्यावहार झाला नसताना अनेकांना जागा खाली करण्याच्या नोटिसा एमएसआरडीसीने बजावल्या आहेत. नागरी वस्ती असणार्‍या भागात जादा अंतर आरक्षित करणार असल्याचे दाखवत मोकळ्या जागांमध्ये कमी अंतर दाखवत मोठ्या व्यावसायकांच्या जागा वाचविण्याचा खटाटोप एमएसआरडीसी कडून सुरु असून ग्रामस्तांनी याला तिव्र विरोध दर्शविला आहे. बुधवारी वलवण महाविद्यालय ते लोणावळा दरम्यान एमएसआरडीसी ने अतिक्रमण विरोधी कारवाई राबवत अनेक टपर्‍या, हातगाड्या, शेड व जाहिरातीचे बोर्ड काढले, काही संरक्षण भिंती काढल्या मात्र हे करत असताना पक्षपातीपणा करत काही व्यावसायकांना अभय दिल्याने संताप व्यक्त होऊ लागला आहे.
मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर सर्वाधिक वाहतुक कोंडी ही झालावाडी ते अंबरवाडी गणपती मंदिर रस्ता, गवळीवाडा या परिसरात होत असताना त्याठिकाणी मात्र रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढण्याचे धारिष्ठ हे अधिकारी दाखवत नाही. गवळीवाडा परिसरात सर्वच व्यावसायकांनी रस्त्याच्या गटारांपर्यत दुकाने व हाँटेल थाटली असताना व खरी वाहतुक कोंडी या भागात होत असताना रस्ते विकास महामंडळ तेथे सर्वावर अर्थपुर्ण मेहेरबान असून गोरगरिबांवर मात्र जेसेबी व बुलडोझर फिरवू पहात आहे.

रस्ता रुंदीकरणात देखिल पक्षपातीपणा

मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ च्या रुंदीकरणासाठी वाहतुक कोंडी होत असलेल्या लोणावळा शहरात २५ मिटर अंतर व ग्रामीण भागात ७० मिटर अंतर दर्शविण्यात आले असल्याने ग्रामीण भागातील नागरिक‍ांनी याला विरोध दर्शविला असून पक्षपातीपणा करणार असाल तर रुंदीकरणासाठी इंचभर जागा देखिल जास्त देणार नाही असा इशारा रस्ते विकास महामंडळाला दिला आहे. रस्ते विकास मंडळाने ग्रामीण भागात जाणिवपुर्वक नागरीवस्ती असणार्‍या बाजुला जादा जागा दाखवत गावं उध्दवस्त करण्याचे धोरण आखल्याने नागरिकांनी या रुंदीकरणाला विरोध दाखविला आहे. शहरात २५ मिटर अंतर असेल तर गग्रामीण भागात देखिल २५ मिटर अंतर करा ही वरसोली, वाकसई, कार्ला आदी ग्रामस्तांची मागणी आहे. जिल्हाधिकारी पुणे यांनी प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाबाबत अद्याप आमच्या कार्यालयाकडे कसलिही माहिती उपलब्ध नसल्याचे लेखी पत्र वाकसई ग्रामपंचायतीला दिले आहे.

अतिक्रमण वाढायला अधिकारी जबाबदार

रस्त्याच्या दुतर्फा आज जे अतिक्रमण वाढलेले दिसत आहे, त्याला संबंधित अधिकार्‍यांचे अर्थपुर्ण संबंध व लाचखोरी जबाबदार आहे. ज्यावेळी ही अतिक्रमणे होत असतात त्यावेळी व्यावसायकांकडून चिरिमिरी घेत हे अधिकारी गप्प बसतात यामुळे रस्त्याच्या कडेने अतिक्रमणे वाढली आहेत. वेळीच यावर रोख लावला असता तर आज अतिक्रमणे पाडण्याची वेळच आली नसती अशा भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
 

Web Title: MSRDC's general hammer on the belly of celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.