इच्छुक उमेदवार शोधताहेत मुहूर्त

By admin | Published: January 29, 2017 04:17 AM2017-01-29T04:17:14+5:302017-01-29T04:17:14+5:30

महापालिकेची रणधुमाळी रंगात यऊ लागली आहे. उमेदवारीअर्ज दाखल करण्यास २७ जानेवारीपासून सुरुवात झाली असून, उमेदवारीअर्ज दाखल करण्याचा मुहूर्त

Muhurat is looking for interested candidates | इच्छुक उमेदवार शोधताहेत मुहूर्त

इच्छुक उमेदवार शोधताहेत मुहूर्त

Next

पिंपरी : महापालिकेची रणधुमाळी रंगात यऊ लागली आहे. उमेदवारीअर्ज दाखल करण्यास २७ जानेवारीपासून सुरुवात झाली असून, उमेदवारीअर्ज दाखल करण्याचा मुहूर्त शोधत आहेत. उमेदवारीत कोणतेही विघ्न येऊ नये, याची दक्षता इच्छुक घेत आहेत.
महापालिकेची निवडणूक फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात होणार आहे. उमेदवारीअर्ज दाखल करण्यास २७ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. शुक्रवारी पौष अमावास्या आहे, तर त्यानंतरच्या दिवशी शनिवारी येतो. त्यानंतर रविवार असा सुटीचा दिवस आहे.
महापालिका निवडणुकीसाठी यंदा प्रथमच आॅनलाइन अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानंतर संबंधित उमेदवाराने कागदपत्रांसह संबंधित अर्जाची प्रिंट आऊट शहरातील ११ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जमा करावयाचा आहे. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या समोरच संबंधित अर्ज राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड केला जाणार आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा तिन्ही दिवशी उमेदवारांना अर्ज प्रत्यक्षपणे निवडणूक कार्यालयात भरता येणार नाही. त्यानंतर सोमवार, ३० जानेवारीपासून तीन फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे उमेदवारीअर्ज भरण्यासाठीची वेळ यासाठी मुहूर्त शोधण्यात इच्छुक मग्न आहेत. (प्रतिनिधी)

अधिकृत यादीची प्रतीक्षा
महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भारतीय जनता पक्ष युती आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. त्यामुळे कोणत्या प्रभागातून कोणाला उमेदवारी द्यायची
याबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता
पक्ष, मनसेच्या उमेदवारीयादीची प्रतीक्षा कार्यकर्त्यांना आहे.
आघाडी आणि युतीबाबत प्रतिकूल आणि अनुकूल अशी केवळ
चर्चाच सुरू आहे. त्यामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला
लागला आहे.

Web Title: Muhurat is looking for interested candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.