मुळशीत राष्ट्रवादीची सत्ता

By admin | Published: February 24, 2017 02:54 AM2017-02-24T02:54:46+5:302017-02-24T02:54:46+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागील जिल्हा परिषद पंचायत समितीतील मिळवलेले यश कायम राखत पुन्हा

Mulshat NCP's power | मुळशीत राष्ट्रवादीची सत्ता

मुळशीत राष्ट्रवादीची सत्ता

Next

हिंजवडी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागील जिल्हा परिषद पंचायत समितीतील मिळवलेले यश कायम राखत पुन्हा एकदा तालुक्यावर सत्ता मिळवली आहे. राष्ट्रवादीने तब्बल चार जागांवर विजय मिळवत पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व राखले. जिल्हा परिषद गटातही दोन जागांवर विजय मिळवला. काँग्रेस व तालुक्यात नवख्या असलेल्या भाजपाला मात्र तालुक्यात खाते उघडता आले नाही. पंचायत समितीच्या उर्वरित दोन जागा व जिल्हा परिषदेची एक जागा मिळवण्यात शिवसेनेला यश आले.
मुळशीतील पंचायत समितीच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी कासार-आंबोली येथील मुलींच्या सैनिकी शाळेत गुरुवारी सकाळी १० वाजता सुरू झाली. यात पौड गणात राष्ट्रवादीच्या कोमल वाशीवले (५८५२ मते) यांनी भाजपाच्या शिल्पा ठोंबरे यांचा पराभव केला. शिवसेनेच्या सचिन साठे (४९९९) यांनी राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष सुनील वाडकर याना पराभूत केले. राखीव असलेल्या बावधन गणात शिवसेनेच्या विजय केदारी (४६१० मते) यांनी राष्ट्रवादीच्या जीवन कांबळे यांचा पराभव केला. माजी सभापती महादेव कोंढरे यांच्या पत्नी राधिका कोंढरे (६०७९ मते) यांनी पिरंगुट गणातून बाजी मारली. त्यांनी शिवसेनेचे माजी सभापती बाळासाहेब पवळे यांच्या पत्नी संगीता पवळे यांचा पराभव केला.
जिल्हा परिषदेच्या बावधन-पिरंगुट गटात अंजली कांबळे (९६४४ मते) यांनी शिवसेनेच्या शारदा ननावरे यांना पराभूत केले. राखीव असलेल्या पौड कासार-आंबोली गटात शिवसेनेच्या सागर कासकर (११,८९२ मते) मिळवत राष्ट्रवादीच्या गणपत जाधव यांचा पराभव केला.
हिंजवडी-माण जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचे शंकर मांडेकर (९४६८ मते) यांनी विजय मिळवत राष्ट्रवादीचा गड राखला. त्यांनी काँग्रेसच्या शिवाजी बुचडे यांचा पराभव करत तालुक्यातील एकमेव सर्वसाधारण जागेवर वर्चस्व मिळवले. तर हिंजवडी गणात शिवसेनेच्या प्राची बुचडे यांचा पराभव करत कोमल बुचडे (३३३६ मते) यांनी विजयश्री खेचून आणली. या गणात अपक्ष असलेल्या सीमा जगताप यांनी घेतलेल्या मतांमुळेदेखील निकालामध्ये मोठा बदल झाल्याचे स्पष्ट होत आहे.
माण गणात अपेक्षेप्रमाणे पांडुरंग ओझरकर (६८३२ मते) यांनी बाजी मारली. त्यांनी शिवसेनेच्या प्रकाश भेगडे यांचा १६७७ मतांनी पराभव केला. (वार्ताहर)

Web Title: Mulshat NCP's power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.