‘वायसीएम’साठी बहुमजली इमारत, स्थायी समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 02:38 AM2017-11-30T02:38:02+5:302017-11-30T02:38:12+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या आवारात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी सुरुवातीला पाच कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.

 A multi-storey building, standing committee for YCM | ‘वायसीएम’साठी बहुमजली इमारत, स्थायी समिती

‘वायसीएम’साठी बहुमजली इमारत, स्थायी समिती

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या आवारात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी सुरुवातीला पाच कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. मात्र, आता बहुमजली इमारत बांधण्यात येणार असून, ५० कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला सर्वसाधारण सभेने प्रशासकीय मान्यता दिली. याशिवाय नाशिक फाटा ते वाकड बीआरटी कॉरिडॉरमध्ये सुदर्शननगर चौकात ग्रेड सेपरेटर बांधण्यासाठी २० कोटी आणि तळवडे जकात नाका ते देहूगाव रस्ता विकसित करण्यासाठी ३० कोटी अशा एकूण १०० कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी नवजात अर्भक विभागाचे नूतनीकरण, डॉक्टरांच्या निवासस्थानाचे नूतनीकरण अशी आवश्यक कामे करण्यात येणार आहे. त्यासाठी सन २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात पाच कोटी रुपयांची तरतूद केली असून, सर्वसाधारण सभेत २० जूनला या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. वायसीएम रुग्णालयासाठी राज्य सरकारने वाढीव ०.५० चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मंजूर केला आहे. त्या अनुषंगाने पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी नेमलेल्या आर्किटेक्ट शशी प्रभू अ‍ॅण्ड असोसिएशन यांना सुधारित नकाशे तयार करण्यास सांगण्यात आले आहे. त्यात रुग्णालय आवारात बहुमजली वाहनतळ, कॅन्टीन, नाईट शेल्टर तसेच इतर आवश्यक कामांसह शस्त्रक्रिया संकुलाच्या एकत्रित आराखड्याचा समावेश आहे. या कामासाठी ५० कोटी रुपये सुधारित अर्थसंकल्पीय रकमेची आवश्यकता आहे. हे काम तातडीने करायचे असल्याने महापालिकेची सुधारित प्रशासकीय मान्यता गरजेची आहे.
सुदर्शननगर चौकात ग्रेड सेपरेटर
नाशिक फाटा ते वाकड बीआरटी कॉरिडॉर अंतर्गत सुदर्शननगर चौकात सद्य:स्थितीत सिग्नल व्यवस्था आहे. प्रवासी वाहतूक वेळेत बचत होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत व्हावी, यासाठी चौक सिग्नल मुक्त करण्यासाठी ग्रेड सेपरेटर बांधण्यात येणार आहे. या कामास महापालिकेच्या सन २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात विशेष योजना या लेखाशीर्षाखाली समाविष्ट करण्यात आले आहे. या कामासाठी २० कोटी रुपये प्रशासकीय मान्यता घेण्यात येणार आहे.
तसेच तळवडे जकात नाका ते देहूगाव कमानीपर्यंतचा रस्ता विकसित करण्यात येणार आहे. या रस्त्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फ त लवकरच भूसंपादन होणार आहे.

नागरिकांची सोय : अमृतेश्वर ट्रस्टच्या जागेचा वापर रस्त्यासाठी

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २८ मासूळकर कॉलनी हा भाग अत्याधुनिक सोयीने विकसित होत आहे. नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने व मुख्य रस्त्यावर होणाºया गाड्यांच्या वाहतुकीस पर्यायी उपलब्धता होणे अत्यंत गरजेचे आहे. टेल्को सीमाभिंती लगतचा रस्ता ते मोरवाडी आयटीआय रस्ता येथील अमृतेश्वर ट्रस्टची जागा नागरिकांच्या सोयीसाठी पर्यायी रस्ता म्हणून घोषित करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. या प्रस्तावानुसार, आयुक्तांनी फ क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य विभाग कार्यकारी अभियंता आणि अमृतेश्वर ट्रस्ट यांच्या सहमतीने हा पर्यायी रस्ता करण्यात आला.

महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार हा रस्ता घोषित करण्याकरिता नागरिकांच्या हरकती किंवा सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यावर एक हरकत आली. हरकतदारास सुनावणीस बोलावूनही अनुपस्थित राहिल्याने हरकत फेटाळली आहे. त्यानुसार, ही जागा रस्ता म्हणून घोषित करण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव विषयपत्रिकेवर दाखल होता. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी विषयपत्र माघार घेत असल्याचे महापौरांनी जाहीर केले. त्यामागील गौडबंगाल कायम आहे.

Web Title:  A multi-storey building, standing committee for YCM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.