मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कारची कंटेनरला धडक,  अपघातात 7 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2017 08:49 AM2017-11-03T08:49:46+5:302017-11-03T08:52:31+5:30

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर शुक्रवारी ( 3 नोव्हेंबर ) पहाटेच्या सुमारास कंटेनरला कारची धडक बसली. या अपघातात 7 जण जखमी झाले आहे.

Mumbai-Pune Express car collided with containers, 7 people injured in accident | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कारची कंटेनरला धडक,  अपघातात 7 जण जखमी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कारची कंटेनरला धडक,  अपघातात 7 जण जखमी

Next

लोणावळा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर शुक्रवारी ( 3 नोव्हेंबर ) पहाटेच्या सुमारास कंटेनरला कारची धडक बसली. या अपघातात 7 जण जखमी झाले आहे. पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.  मिळालेल्या माहितीनुसार,  एक्स्प्रेस वेवरुन पुण्याच्या दिशेने जाणारी आर्टिका मोटार ( MH15 DM 9940) या कारची समोर येणा-या कंटेनरला धडक बसल्याने हा अपघात झाला आहे. या गाडीमध्ये सात प्रवासी होते. यामध्ये किरकोळरित्या जखमींना लोणावळ्यामधील यश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्याव, यातील एका प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर मार लागल्याने त्यांना पनवेल येथे रवाना करण्यात आले आहे. 

जखमी झालेले प्रवासी नाशिकमधील घोटी गावातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर आयआरबीचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले व त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तसेच जखमींच्या नातेवाईकांशी संपर्क करुन त्यांना याबाबतची माहितीही देण्यात आली. दरम्यान, या अपघातात कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. 

Web Title: Mumbai-Pune Express car collided with containers, 7 people injured in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात