चक्रीवादळामुळे निर्माण झालेली आपत्ती हाताळण्यात पिंपरी महापालिका प्रशासनास अपयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 11:00 PM2020-06-05T23:00:36+5:302020-06-05T23:01:07+5:30
आपत्कालीन व्यवस्था सक्षम नाही, सत्ताधारी की आयुक्त अपयशी आहे, हे कळत नाही.
पिंपरी : चक्रीवादळामुळे झालेली आपत्ती हाताळण्यात महापालिका प्रशासनास अपयश आले आहे, असा आरोप सत्ताधारी आणि विरोधी पक्ष नगरसेवक यांनी केला आहे. महापालिका सर्वसाधारण सभेत आपत्ती व्यवस्थापनावर चर्चा झाली. सुजाता पालांडे म्हणाल्या, आपत्तीत पडलेली झाडे उचलली नाही, आजही एकही अधिकारी फिल्डवर नाही, प्रशासन झोपले होते.
हर्षल ढोरे म्हणाले, प्रशासन झोपलेले आहे, सांगवीतही झाडे पडली आहेत.
मंगला कदम म्हणाल्या, आपत्कालीन व्यवस्था असावी. डॉ. वैशाली घोडेकर म्हणाल्या, आपत्ती व्यवस्थापनास मनुष्यबळ द्यावे, धरण भरलं तरी पाणी नाही. हे सत्ताधाऱ्याचे अपयश. संदीप वाघेरे म्हणाले,सत्ताधारी की आयुक्त अपयशी आहे, हे कळत नाही. कैलासनगर भागात पाणी शिरलं, झाडे पडली आहेत. दत्ता साने म्हणाले, दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. आपत्कालीन व्यवस्था सक्षम नाही.विकास डोळस म्हणाले,आपत्ती व्यवस्थापन आहे की नाही कळत नाही.
धन्वंतरी योजना का लादली..
अजित गव्हाणे म्हणाले, धन्वंतरी योग्य असताना विमा योजना लादली. सभागृह नियमाने चालवायला हवे. आशा शेंडगे म्हणाल्या, धरणात पाणी आहे. रोज पाणी देऊ शकतो का, याचा विचार व्हावा. संतोष लोंढे म्हणाले, धरण भरलंय, पाणी नियमितपणे देता येईल का? उपमहापौर तुषार हिंगे म्हणाले, टेल्को रोडवर झाडांमुळे मृत्यू झाला. त्यांना मदत मिळाली की नाही? यापुढे एकही माणूस दगावला तर ३०२ गुन्हा दाखल करू. राहुल कलाटे म्हणाले, आपत्ती यंत्रणा सज्ज ठेवायला हवी. पंधरा वर्षे काय केले. हे विचारताना आताचेच तुमचे नेते आहेत. त्यामुळे कुणाला बोलण्याच्या अधिकार नाही.