महापालिकेचा लिपिक लाच घेताना रंगेहाथ पकडला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 06:48 PM2018-03-26T18:48:04+5:302018-03-26T18:48:04+5:30

पत्नीच्या नावे मिळकतीची नोंद केल्याच्या पावतीसाठी पिंपरी क्षेत्रीय कार्यालयातील कनिष्ठ लिपिक २ हजार रुपये मागत होता.

The municipal clerk caught accepting a bribe. |  महापालिकेचा लिपिक लाच घेताना रंगेहाथ पकडला.

 महापालिकेचा लिपिक लाच घेताना रंगेहाथ पकडला.

Next
ठळक मुद्देलाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे पोलीस अधिक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पिंपरी : नव्याने खरेदी केलेल्या सदनिका पत्नीच्या नावे नोंदणी करण्यास गेलेल्याकडून ३ हजाराची लाच घेणाऱ्या लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी रंगेहाथ पकडले. अमोल चंद्रकांत वाघेरे असे लिपिकाचे नाव आहे. हा प्रकार पिंपरी गावात महापालिकेच्या करसंकलन विभागाच्या कार्यालयात घडला. 
तक्रारदार व्यक्तिने लाचलुचपत प्रतिबंध विभाग पुणे यांच्याकडे पिंपरी चिंचवड महापालिकेचा लिपिक लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार दिली होती, त्यांनी खरेदी केलेली सदनिका पत्नीच्या नावे हस्तांतरण केली, पत्नीच्या नावे मिळकतीची नोंद केल्याच्या पावतीसाठी पिंपरी क्षेत्रीय कार्यालयातील कनिष्ठ लिपिक वाघेरे २ हजार रुपये मागत होता. त्यास २ हजार रुपयांची लाच घेताना सोमवारी रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे पोलीस अधिक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. 

Web Title: The municipal clerk caught accepting a bribe.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.