शास्तीकर माफीचा काउंटडाऊन फलक महापालिकेने हटविला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 02:51 AM2019-01-22T02:51:00+5:302019-01-22T02:51:07+5:30
चिंचवड येथील कार्यक्रमात ‘शास्तीची धास्ती पंधरा दिवसांत घालवू’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.
पिंपरी : चिंचवड येथील कार्यक्रमात ‘शास्तीची धास्ती पंधरा दिवसांत घालवू’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. आश्वासनाचे काउंटडाऊन आंदोलन महापालिकेसमोर सुरू केले होते. पंधराव्या दिवशी आश्वासन पूर्ण न झाल्यास फलकावर गाजर येणार होते. त्यापूर्वीच फलक सोमवारी गायब झाला आहे.
महापालिकेतील विविध विकासकामांच्या उद्घाटन समारंभात शास्तीची धास्ती मिटवा, अशी आर्जव आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यावर अनधिकृत बांधकामांची शास्ती येत्या पंधरा दिवसांत माफ करु,असे आश्वासन दिले होते. त्यावर राष्टÑवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसे आदी विरोधीपक्षांनी १५ जानेवारीपासून ‘‘काउंटडाऊन’’ सुरु केले होते.
।सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनास हाताशी धरुन हा फलक आजच काढून रडीचा डाव खेळला आहे. सत्ताधारी भाजपा व प्रशासन यांनी मिळून मुख्यमंत्री यांनी दिलेले आश्वासन हे मोठे गाजर होते. हेच या कृतीवरून सिद्ध होते.
- दत्ता साने, विरोधी पक्षनेते