सिटी ट्रान्स्फर्मेशनसाठी महापालिका कामाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 03:22 AM2018-06-15T03:22:31+5:302018-06-15T03:22:31+5:30
शहर परिवर्तन करण्यासाठी महापालिका नियोजन करीत आहे. त्याबाबत महापालिकेकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी येणाऱ्या स्वयंसेवकांना सर्वेक्षणाची माहिती देऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले.
पिंपरी - शहर परिवर्तन करण्यासाठी महापालिका नियोजन करीत आहे. त्याबाबत महापालिकेकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी येणाऱ्या स्वयंसेवकांना सर्वेक्षणाची माहिती देऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले. सूचनांविषयीच्या सर्वेक्षणास अल्प प्रतिसाद मिळाला असून, या कार्यालयावर कोट्यवधींचा खर्च केला जात असताना सर्वेक्षणास आता महापालिका कर्मचाºयांना जुंपले जाणार आहे.
सिटी ट्रान्स्फर्मेशन आॅफिसच्या कामकाजाची माहिती माध्यमांना देण्यासाठी महापालिकेने पत्रकार परिषद आयोजित केली होती. उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सहायक आयुक्त अण्णा बोदडे उपस्थित होते. या वेळी आयुक्तांनीच या प्रकल्पांची माहिती दिली. हर्डीकर म्हणाले, ‘‘शहराचा चेहरा बदलून शहराची एक विशेष ओळख निर्माण करणे. जगासाठी एक शहर म्हणून केवळ काम करणे नव्हे, तर जग ओळखेल असे शहर तयार करणे हे महापालिकेचे नवीन उद्दिष्ट आहे. सिटी ट्रान्स्फर्मेशनचे उद्दिष्ट साधण्याकरिता सिटी ट्रान्स्फर्मेशन आॅफिस कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे.’’
सिटी ट्रान्स्फर्मेशनचे काम करणाºया सल्लागार संस्थेच्या प्रतिनिधींनी केवळ तीन मिनिटांत इंग्रजीत सादरीकरण केले. त्याचे भाषांतर आयुक्तांनी मराठीत केले. आयुक्तांनीच सल्लागार संस्था किती अनुभवी आहे, असे गोडवे गायले.
१सर्वेक्षण करण्याची जबाबदारी खासगी सल्लागार संस्थेची आहे. तीन आठवड्यांत केवळ ३०३५ जणांचे सर्वेक्षण झाले आहे. सिटी ट्रान्स्फर्मेशनसाठी महापालिका वर्षाला साडेसात कोटी रुपये खर्च करीत असताना सल्लागार संस्थेचे काम महापालिका कर्मचाºयांकडून करवून घेतले जाणार आहे.
२महापालिकेच्या संकेतस्थळावर आॅनलाइन अर्ज ९५६ भरले असून, सीएफसीकडून ८५८, करसंकलन कार्यालयातून ३१, एका वृत्तपत्रासंबंधित दोन संस्थांकडून १३२० अर्ज भरून घेतले आहेत. अर्ज भरण्यासाठी महापालिका कर्मचाºयांना राबवून घेणार
आहे. या कामासाठी लाखोंचा
खर्च होणार आहे. अर्जांची सत्त्यता कशी तपासणार, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.