पूरग्रस्तांना नगरसेवकांचे महिन्याचे मानधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 02:16 AM2018-08-21T02:16:27+5:302018-08-21T02:16:43+5:30
पिंपरी-चिंचवडचे सर्वच १३३ नगरसेवक एका महिन्याचे मानधन देणार आहेत.
पिंपरी : केरळमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरपरिस्थितीमुळे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. केरळवासीयांना मदतीचा हात देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पिंपरी-चिंचवडचे सर्वच १३३ नगरसेवक एका महिन्याचे मानधन देणार आहेत. सुमारे वीस लाखांची मदत करणार आहेत.
महापालिकेची सर्वसाधारण सभा आज झाली. अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिकेत निवडून आलेले १२८ नगरसेवक आहेत. तर, पाच स्वीकृत नगरसेवक असे एकूण १३३ नगरसेवक आहेत. पिंपरी पालिकेतील एका नगरसेवकाला महिन्याला १५ हजार रुपये मानधन आहे. महिन्याचे १९ लाख ९५ हजार रुपये होतात. महापौर राहुल जाधव आणि सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले. तसेच अधिकारी आणि कर्मचारी यांनीही मदत करावी, असे आवाहन महापौरांनी केले आहे.