Pimpri Chinchwad Crime | रिक्षात सुरू होते अश्लिल चाळे, चालकाने हटकल्याने केला निर्घृण खून; दापोडीतील घटना
By रोशन मोरे | Updated: March 20, 2023 16:43 IST2023-03-20T16:42:57+5:302023-03-20T16:43:50+5:30
हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे...

Pimpri Chinchwad Crime | रिक्षात सुरू होते अश्लिल चाळे, चालकाने हटकल्याने केला निर्घृण खून; दापोडीतील घटना
पिंपरी : मैत्रीणीसोबत रिक्षामध्ये अश्लील चाळे करत बसलेल्या रिक्षाचालकाने हटकले. त्याचा राग धरून तेरा गेम बजा डालता हूं, असे म्हणत रिक्षाचालकाच्या डोक्यात विट-सिमेंटचा तुकडा मारून हत्या केली. हत्या झालेल्या रिक्षाचालकाचे नाव अलीम उर्फे अली इस्माईल शेख (वय ४२) असे आहे. हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि.१९) दापोडी येथे घडली. अटक केलेल्या आरोपीचे नाव अमित बाळासाहेब कांबळे (वय २६, रा. दापोडी) असे आहे. या प्रकरणी असिफ इस्माईल शेख (वय ४६, रा. नानापेठ) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा यांचा भाऊ अलीम हे जवळकरनगरमध्ये लावलेल्या रिक्षा घेण्यासाठी गेले असता त्यांना आरोपी त्याच्या मैत्रीणीसह रिक्षामध्ये अश्लिल चाळे करत बसलेला दिसून आला. अलीम याने त्याला हटकले. आरोपीला त्याचा राग आला असता त्याने तेरा गेम बजा डालता हूँ, असे म्हणत रस्त्यावरील विटा आणि सिमेंटचे तुकडे अलीम यांच्या डोक्यात, छाती मारून त्यांना ठार केले, असे फिर्यादीत नमूद आहे.
रिक्षात काहीजण बसलेले असताना रिक्षाचालकाने त्यांना हटकले. यावरून झालेल्या वादात रिक्षाचालकाच्या डोक्यात सिमेंट गट्टू मारून खून केला. दापोडी येथील गणेशनगर येथे रविवारी (दि. १९) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.