चोरीच्या उद्देशाने भरदिवसा दुकानात शिरून महिलेचा खून; आरोपीला १० दिवसांत अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 07:34 PM2022-08-26T19:34:07+5:302022-08-26T19:34:21+5:30

तब्बल २५० सीसीटीव्ही तपासत गुन्हे शाखेच्या गुंड विरोधी पथकाने आरोपीला अटक केली

Murder of a woman by entering a shop in broad daylight with intent to steal Accused arrested within 10 days | चोरीच्या उद्देशाने भरदिवसा दुकानात शिरून महिलेचा खून; आरोपीला १० दिवसांत अटक

चोरीच्या उद्देशाने भरदिवसा दुकानात शिरून महिलेचा खून; आरोपीला १० दिवसांत अटक

Next

पिंपरी : दहा दिवसांपुर्वी भोसरीमध्ये भर दिवसा दुकानात शिरून महिलेची हत्या करण्यात आली होती. तब्बल २५० सीसीटीव्ही तपासत गुन्हे शाखेच्या गुंड विरोधी पथकाने आरोपीला अटक केली. चोरीच्या उद्देशाने आरोपीने महिलेचा खून केला, असे पोलीस तपासात उघड झाले. अटक केलेल्या आरोपीचे नाव रामकिशन शंकर शिंदे (वय २४, रा. कारेगाव, ता. शिरूर, मुळगाव- बाभुळगाव, हिंगोली) असे आहे. हत्या झालेल्या महिलेचे नाव पुजा ब्रजकिशोर प्रसाद (वय ३१) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ ऑगस्टला सकाळी पुजा हिच्या दुकानात तिची हत्या करून आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासत आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी रांजणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका ब्युटी पार्लर चालविणाऱ्या महिलेचा मोबाईल आणि १० हजार रुपये चोरणारा आरोपी सीसीटिव्हीमध्ये कैद झाला होता. तोच पूजा हिची हत्या करणारा आरोपी आहे, असे सीसीटिव्ही पाहिल्या नंतर पोलिसांची खात्री पटली. पोलिसांनी कारेगाव परिसरात आरोपीचा फोटो दाखवून चौकशी केली असता आरोपी खंडोबा मंदिराच्या मागे उभा असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता चोरीच्या उद्देशाने आपण खून केल्याची त्याने कबूली दिली. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर ठाणे शहरातील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात चोरीचा एक तर मोबाईल चोरण्याचे दोन गुन्हे दाखल आहे.

Web Title: Murder of a woman by entering a shop in broad daylight with intent to steal Accused arrested within 10 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.