गळा दाबून पिंपरीत एकाचा खून; अज्ञात आरोपींचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 03:12 PM2017-11-22T15:12:07+5:302017-11-22T15:14:56+5:30
मोनिका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या कुलवंत जगजीत जुनेजा (वय ३७) या इसमाचा गळा दाबून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला. अज्ञात आरोपींनी खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले आहे.
पिंपरी : तपोवन मंदिराजवळील मोनिका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या कुलवंत जगजीत जुनेजा (वय ३७) या इसमाचा गळा दाबून खून केल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी उघडकीस आला. अज्ञात आरोपींनी खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलीस तपासात निदर्शनास आले आहे.
पोलिसांनी दिलल्या माहितीनुसार, नाक, तोंड उशीने दाबूव श्वास गुदमरून जुनेजा यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट झाले आहे. जुनेजा यांचा राहत्या घरात मृतदेह पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता, आत्महत्या केली असावी, असे भासविणारी परिस्थिती तेथे दिसून आली. पोलिसांनी मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी वायसीएम रूग्णालयाकडे पाठविला. त्यानंतर श्वास गुदमरून जुनेजा यांचा मृत्यू झाल्याचे कारण निदर्शनास आले. अज्ञात आरोपीने जुनेजा यांचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. वरिष्ठ पोलीस निरिक्षक विवेक मुगळीकर अधिक तपास करीत आहेत.
पिंपरी चिंचवड मध्ये गेल्या काही महिन्यात खुनाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. टोळीयुद्धातून तर कधी घरगुुती कारणावरून आणि आर्थिक व्यवहारातून या घटना घडत असल्याचे समोर आले आहे. किरकोळ कारणावरूनही खुनाचे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे.