आळंदी नगरपरिषदेचे भाजपा नगरसेवक बालाजी कांबळे यांचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 18:32 IST2018-06-26T18:30:25+5:302018-06-26T18:32:43+5:30
आळंदी नगरपरिषदेचे भाजपा नगरसेवक बालाजी कांबळे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्याराने वार करत त्यांची निर्घृण हत्या केली

आळंदी नगरपरिषदेचे भाजपा नगरसेवक बालाजी कांबळे यांचा खून
ठळक मुद्दे पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाला असल्याचा पोलिसांचा अंदाज
पिंपरी : आळंदी नगरपरिषदेचे भाजपा नगरसेवक बालाजी कांबळे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्याराने वार केले. गंभीर जखमी झालेल्या कांबळे यांना पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
आळंदी नगरपरिषदेचे भाजपा नगरसेवक कांबळे यांना चऱ्होली आळंदी रास्ता येथे हल्लेखोरांनी गाठले. त्यांच्यावर धारधार शास्त्राने वर करण्यात आले. पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाला असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दिघी पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.