पिंपळे गुरवमध्ये बोलण्याच्या कारणावरून तरुणावर खुनी हल्ला; पाच जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 07:18 PM2022-03-22T19:18:50+5:302022-03-22T19:21:35+5:30
रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली....
पिंपरी : बोलण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणानंतर तरुणावर खुनी हल्ला केला. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नवी सांगवी आणि पिंपळे गुरव येथे रविवारी (दि. २०) रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.
अक्षय शत्रुघ्न सांगळे (वय २९, रा. लक्ष्मी नगर, पिंपळे गुरव) असे खुनी हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी सोमवारी (दि. २१) याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तसेच त्याचा भाऊ प्रज्वल अंकुश यादव (वय १८) हा देखील मारहाणीत जखमी झालेला आहे. मोन्या धिवार, आशित धिवार आणि त्यांचे तीन सहकारी (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सांगळे व त्यांचा भाऊ जाधव हे दोघे जण दुचाकीवरून चालले होते. ते नवी सांगवी येथील गणेश मंगल कार्यालय जवळ आले असता त्यांची आरोपींशी बोलाचालीवरून भांडण झाले. त्यानंतर सव्वा आठच्या सुमारास फिर्यादी हे पुन्हा दुचाकीवरून चाललेले असताना राम नगर, पिंपळे गुरव येथे आरोपी धिवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या तीन अज्ञात आरोपींनी त्यांना अडविले. तसेच सांगळे यांच्या दोन्ही हातावर डोक्यावर, कोयता आणि लाकडी दांड्याने मारून त्यांच्यावर खूनी हल्ला करीत जखमी केले. तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या हातातील लाकडी दांड्याने उजव्या पायाच्या गुडघ्याच्या खाली मारहाण केली.