नामफलकावरून सत्ताधा-यांत दुफळी; चर्चा न करताच सर्वसाधारण सभेने गुंडाळले धोरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 04:06 AM2018-03-04T04:06:08+5:302018-03-04T04:06:08+5:30
पिंपरी-चिंचवड शहरातील माजी नगरसेवक, पदाधिकारी अशा सन्माननीयांच्या नामफलकांविषयी लोकमतने स्टिंग आॅपरेशन केले होते. त्यानंतर दखल घेऊन स्थायी समितीने धोरण करण्याच्या सूचना केल्या होत्या. या धोरणावर पाणी पडले आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील माजी नगरसेवक, पदाधिकारी अशा सन्माननीयांच्या नामफलकांविषयी लोकमतने स्टिंग आॅपरेशन केले होते. त्यानंतर दखल घेऊन स्थायी समितीने धोरण करण्याच्या सूचना केल्या होत्या. या धोरणावर पाणी पडले आहे.
सत्ताधाºयांनी याबाबतचा प्रस्ताव दफ्तरी दाखल केला आहे. त्यामुळे शहरात लावण्यात आलेले नगरसेवकांचे पाच-पाच नामफलक कायम राहणार आहेत. यामुळे शहराचे विद्रूपीकरण कायम राहणार आहे. सत्ताधाºयांनी स्वत:चेच धोरण बासनात गुंडाळले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात नगरसेवकांच्या मागणीनुसार त्यांचे निवासस्थान, कार्यालयाकडे दिशा दर्शविणारे नामफलक लावले जातात. शहरात एका नगरसेवकाचे चार ते पाच वेगवेगळे नामफलक लावले गेले आहेत. नगरसेवकांच्या कार्यालयाकडे, निवासस्थानाकडे आणि संपर्क कार्यालयाकडे, असे फलक शहराच्या चौका-चौकांत, गल्ली बोळात लावले गेले आहेत. तसेच फलकाचे रंग आणि अक्षरेही वेगवेगळी आहेत. त्याचा आकार आणि उंचीही भिन्न आहे. माजी नगरसेवक आणि पदाधिकाºयांचेही शहरात मोठ्या प्रमाणात नामफलक आहेत. यामुळे विद्रूपीकरण वाढले आहे.
सन्माननीयांची चमकोगिरी असे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. याची दखल घेऊन स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी नामफलकाबाबत धोरण ठरविण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या होत्या. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्थायी समितीने केलेल्या सूचनेनुसार नामफलकाबाबत स्वत:चे धोरण ठरविले होते.
महासभेत सत्ताधाºयांमध्ये दुही
स्थायी समितीने केलेल्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेने ब्रेक लावला आहे. सभेत हा प्रस्ताव मान्यतेसाठी महासभेसमोर ठेवला होता. मागील सभेत सत्ताधाºयांनी कोणतीही चर्चा न करता हा प्रस्ताव तहकूब केला होता.
या प्रस्तावावर कोणतीही चर्चा न करता २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या सभेत हा प्रस्ताव सत्ताधाºयांनी दप्तरी दाखल केला. भाजपाच्या सदस्यांनी शहरात स्वत:चे नाम दिशादर्शक फलक पक्षाच्या रंगाचे उभारले आहेत. त्यामुळे पक्षात मतभेद असल्याचे दिसून येत आहे.
असे होते धोरण
विद्यमान आणि माजी नगरसेवक, पदाधिकारी यांच्या नावाचा त्यांच्या निवासस्थानाकडे जाणाºया मुख्य रस्त्याच्या कडेला एकच फलक लावावा. लगतच्या मागील निवडणुकीतीलच माजी नगरसेवकाचा नामफलक लावावा. फलक तीन फूट आणि दोन फूट आकाराचा असवा. त्याची जमिनीपासून उंची सात फूट असावी. फलक हिरव्या फ्लोरोसंट रंगामध्ये असावा. तसेच मजकूर पांढºया अक्षरांत मराठीमध्ये लिहावा. नावाच्या अक्षरांची उंची दहा सेंटिमीटर व इतर मजकुरांच्या अक्षरांची उंची सात सेमी इतकी असणार होती, असे धोरण तयार केले होते.