‘रोझलँड’ला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान, दिल्ली येथे केंद्रीय राज्यमंत्री एस. एस. अहलुवालिया यांच्या हस्ते गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 05:09 AM2017-10-03T05:09:10+5:302017-10-03T05:09:16+5:30
पिंपळे सौदागर येथील रोझलँड रेसिडेन्सी या सोसायटीला रहिवासी विभागातील स्वच्छतेबाबत भारत सरकारचा राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कार पेयजल व स्वच्छता खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री एस. एस. अहलुवालिया यांच्या हस्ते
पिंपरी : पिंपळे सौदागर येथील रोझलँड रेसिडेन्सी या सोसायटीला रहिवासी विभागातील स्वच्छतेबाबत भारत सरकारचा राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कार पेयजल व स्वच्छता खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री एस. एस. अहलुवालिया यांच्या हस्ते व पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्री उमा भारती यांच्या उपस्थितीत सोमवारी प्रदान करण्यात आला.
दिल्ली येथील विज्ञान भवन येथे झालेल्या समारंभास नगरसेवक नाना काटे, रोझलँड रेसिडेन्सीचे अध्यक्ष संतोष मस्कर, आनंद दप्तरदार, सिद्धार्थ नाईक, अभय कुलकर्णी, रोहन रानडे, बांधकाम व्यावसायिक विनोद चांदवानी, सोसायटीचे व्यवस्थापक प्रल्हाद नायकिंदे, नीलेश जगताप यांनी सोसायटीच्या वतीने पुरस्कार स्वीकारला.
या विषयी सोसायटीचे अध्यक्ष संतोष मस्कर म्हणाले की, हा पुरस्कार म्हणजे सोसायटीच्या सदस्यांनी केलेल्या मेहनतीचे फळ आहे. आम्ही केलेल्या कामाची दखल केंद्र सरकारने घेतली याचा आनंद वाटतो. यातून इतर सोसायट्यांनाही प्रोत्साहन मिळेल. भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत सोसायटीमध्ये स्वच्छता करण्यासाठी प्लॅस्टिक व ई-वेस्ट गोळा करण्यास सुरुवात केली. त्यानुसार पुढे ओला कचरा, पालापाचोळाही गोळा करून त्यापासून खतनिर्मिती सुरू केली.