राष्ट्रवादी, काँग्रेस शहराध्यक्षांचा राजीनामा

By admin | Published: February 24, 2017 02:33 AM2017-02-24T02:33:59+5:302017-02-24T02:33:59+5:30

महापालिका निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला अपयश आल्याबद्दल नैतिक जबाबदारी

Nationalist Congress Party President resigns | राष्ट्रवादी, काँग्रेस शहराध्यक्षांचा राजीनामा

राष्ट्रवादी, काँग्रेस शहराध्यक्षांचा राजीनामा

Next

पिंपरी : महापालिका निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला अपयश आल्याबद्दल नैतिक जबाबदारी स्वीकारून संजोग वाघेरे आणि सचिन साठे यांनी राजीनामा दिला आहे.
महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती. ८३ नगरसेवकांसह ११ अपक्षांचा पाठिंबा राष्ट्रवादीला होता, तर अपक्ष आणि १४ काँग्रेसचे नगरसेवक मिळून तयार झालेल्या आघाडीला विरोधी पक्षनेतेपद दिले होते. त्यामुळे पाचही वर्षे काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सत्तेत वाटेकरी होते. महापालिका निवडणुकीत ८३ वर असणारी राष्ट्रवादी ३७ वर आली, तर १४वर असलेली काँग्रेस झीरो झाली. विकास करूनही नाकारल्याची खंत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केली.

शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करून भाजपाने यश संपादन केले आहे. पक्षाचा पराभव मान्य आहे. पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारून शहराध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे राजीनामा पाठविला आहे.
- सचिन साठे, शहराध्यक्ष, काँग्रेस

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा विकास कोणी केला हे जनता ओळखून आहे. असे असतानाही अपयश आले. नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देत आहे.
- संजोग वाघेरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी

Web Title: Nationalist Congress Party President resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.