नवरात्र उत्सवाच्या तयारीत सेवक दंग
By admin | Published: October 13, 2015 01:18 AM2015-10-13T01:18:06+5:302015-10-13T01:18:06+5:30
कोथरूड भागातील मानाच्या तुळजाभवानी मातेच्या उत्सवाच्या निमित्ताने कोथरूडच्या डोंगरमाथ्यावर असलेल्या तुळजाभवानी मातेच्या तयारीत सध्या सेवक दंग असून
कोथरूड : कोथरूड भागातील मानाच्या तुळजाभवानी मातेच्या उत्सवाच्या निमित्ताने कोथरूडच्या डोंगरमाथ्यावर असलेल्या तुळजाभवानी मातेच्या तयारीत सध्या सेवक दंग असून, घटस्थापनेच्या मुहूर्तावर मातेचे गौरवशाली रूप साकारण्यासाठी सध्या मंदिराचे सेवक साफसफाईच्या कामात गुंतलेले आहेत.
कोथरूडच्या रामबाग कॉलनी भागातील डोंगरमाथ्यावर असलेल्या तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला कोथरूड भागातील अनेक भाविक येत असल्याने भाविकांच्या सोयीसाठी मंदिराच्या आवारात मंडप टाकून गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे काम केले आहे.
कोथरूडच्या डोंगरमाथ्यावर असलेले भाविक रांगेतून दोन ते तीन तास येत असल्याने दर्शनानंतर विसावा घेण्याची सोय करण्यात आली असल्याचे देवस्थान समितीचे जालिंंदर सुतार यांनी सांगितले.
देवीच्या भाविकांचे असलेले नवस अन् होमहवन करण्याची सोय मंदिराच्या आवारातच करण्यात आली असल्याने भाविकांना देवीच्या समोर होमहवन करण्याची संधी मिळत असल्याने कोथरूड भागातील भाविक या भागात विधी करण्याला प्राधान्य देत असतात. नुकत्याच झालेल्या पावसाने डोंगरमाथ्यावर हिरवळीचा शालू चढला असल्याने यंदाच्या उत्सवात प्रसन्नता येणार असल्याचा विश्वास देवस्थान समितीला वाटत आहे. (वार्ताहर)