राष्ट्रवादी, स्वाभिमानी मावळात एकत्र लढणार

By admin | Published: February 2, 2017 03:49 AM2017-02-02T03:49:47+5:302017-02-02T03:49:47+5:30

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यांची युती झाली आहे. आगामी निवडणुका एकत्र लढण्याचा

NCP, Swabhimani will fight together in the Maval | राष्ट्रवादी, स्वाभिमानी मावळात एकत्र लढणार

राष्ट्रवादी, स्वाभिमानी मावळात एकत्र लढणार

Next

वडगाव मावळ : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यांची युती झाली आहे. आगामी निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे दोन्ही पक्षांच्या तालुकाध्यक्षांनी जाहीर केले.
जिल्हा बँकेंचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांच्या उपस्थितीत येथे झालेल्या बैठकीत स्वाभिमानी रिपब्लिकचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी राष्ट्रवादीबरोबर युती झाल्याचे जाहीर केले.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश ढोरे, नगरसेवक गणेश खांडगे, ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष काळुराम मालपोटे, रमेश गायकवाड, सुभाष जाधव, मंगेश ढोरे, स्वाभिमानीचे राष्ट्रीय सरचिटणिस अनिल भांगरे, सखाराम गायकवाड, भाऊसाहेब साबळे, कृष्णा गायकवाड, संंदीप ओव्हाळ, रवींद्र पवार, पी.बी. भालसेन, विनोद गायकवाड, महेश ओव्हाळ, चद्रंकांत ओव्हाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते
प्रास्ताविकात भालेसैन यांनी मावळ तालुक्यात सर्वच निवडणुकांत स्वाभिमानी पक्ष राष्ट्रवादीबरोबर असून पंचायत समितीतील इंदोरी गणातील अनुसूचित जातीची महिला ही जागा देण्याची मागणी केली होती.
ती मान्य करीत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ढोरे यांनी इंदोरी गणाची जागा देण्याचे जाहीर करताना स्वाभीमानी पक्षाला मानाचे स्थान देण्याचे स्पष्ट केले. (वार्ताहर)

Web Title: NCP, Swabhimani will fight together in the Maval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.