गॅस दरवाढीच्या विरोधात पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 03:13 PM2017-11-03T15:13:07+5:302017-11-03T15:37:18+5:30

गॅस दरवाढीच्या विरोधात पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आंदोलकांनी यावेळी तीव्र घोषणा दिल्या.

NCP's agitation in Pimpri-Chinchwad against gas price hike | गॅस दरवाढीच्या विरोधात पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची निदर्शने

गॅस दरवाढीच्या विरोधात पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची निदर्शने

Next
ठळक मुद्देएक नोव्हेंबरपासून विनाअनुदानित गॅस सिलेंडर ९३ रुपयांनी महागअनुदानित गॅस सिलेंडरचे दर वाढले ४.५६ रुपयांनी

पिंपरी : घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आंदोलकांनी तीव्र घोषणा दिल्या. महागाई करणार्‍या सरकारचा धिक्कार असो...गॅस दरवाढ मागे घेतलीच पाहिज, अशा घोषणा महिलांनी दिल्या.
पिंपरीतील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात माजी महापौर व नगरसेविका अपर्णा डोके, पक्ष प्रवक्ते फजल शेख, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर प्रदेश सरचिटणीस युवक लाला चिंचवडे, प्रदेश युवक संघटक विशाल काळभोर, उपाध्यक्ष संतोष वाघेरे, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष विनोद कांबळे, सामाजिक न्याय विभाग महिला अध्यक्षा गंगा धेंडे, नगरसेविका संगिता ताम्हाणे, माजी नगरसेविका मंदा आल्हाट, शकुंतला भाट, अनिता तापकीर, पुष्पा शेळके, संगिता जाधव, मिनाक्षी उंबरकर, सविता खराडे, पौर्णिमा पालेकर, मनिषा गटकळ, सविता धुमाळ, शिला भोंडवे, दिपाली देशमुख, सुर्वणा काळभोर, नलिनी शेडगे, दिपाली गायकवाड, विजया काटे, रूपाली गायकवाड, यतिन पारेख, प्रदीप गायकवाड, सूर्यकांत माने, समीर थोपटे, संदीप पाटील, निलेश पुजारी, धैर्यशील धर्मे, बाळासाहेब जगताप, स्टीफन विल्सन आदी उपस्थित होते. 
एक नोव्हेंबरपासून विनाअनुदानित गॅस सिलेंडर ९३ रुपयांनी महागला आहे. अनुदानित गॅस सिलेंडरचे दर ४.५६ रुपयांनी वाढले आहेत. या वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. 
विकास वेडा झाला...माझा संसार उद्ध्वस्त झाला.. अशा मजकूराचे फलक आंदोलक महिलांनी हातामध्ये घेतले होते. तसेच महागाई करणाºया सरकारचा धिक्कार असो...गॅस दरवाढ मागे घेतलीच पाहिजे, अशा घोषणा महिलांनी दिल्या.

Web Title: NCP's agitation in Pimpri-Chinchwad against gas price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.