राष्ट्रवादी काँगे्रस पार्टीचे प्रबळ दावेदार मोहन भालेराव
By admin | Published: January 30, 2017 02:50 AM2017-01-30T02:50:33+5:302017-01-30T02:50:33+5:30
प्रभाग क्रमांक २७ (अ) अनुसूचित जाती या संवर्गातील राखीव जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इच्छुक उमेदवार मोहन दादू भालेराव यांनी प्रचाराचा नारळ फोडला.
रहाटणी : प्रभाग क्रमांक २७ (अ) अनुसूचित जाती या संवर्गातील राखीव जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इच्छुक उमेदवार मोहन दादू भालेराव यांनी प्रचाराचा नारळ फोडला. मागील अनेक दिवसांपासून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली असून, त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. गावातील स्थानिक उमेदवारच निवडून देण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी मोहन भालेराव यांना पाठींबा दिला असून, रोजच्या प्रचारात हिरिरीने सहभाग घेत आहेत. त्यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली असल्याने भालेराव यांनाच राष्टवादीचे उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा प्रभागात रंगत आहे.
मोहन भालेराव हे मागील अनेक वर्षांपासून संगणक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवित आहेत. सांप्रदायातही त्यांचे मोठे योगदान आहे. मागील अनेक वर्षांपासून देहू ते पंढरपूर वारीत रहाटणीच्या जोगेश्वरी सांप्रदायिक दिंडीत ते सहभागी असतात. त्यामुळे परिसरात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. ते नेहमी इतरांच्या मदतीला व अडी-अडचणीला आपलीच अडचण समजून सोडविण्याचा प्रयत्न करतात. गावातील सर्वच सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यामुळे परिसरातील नागरिकांना ते आपलेसे वाटतात. मोहन भालेराव यांनी निवडणुकीत उभे राहून रहाटणी गावाचे प्रतिनिधित्त्व करावे, अशी ग्रामस्थांची इच्छा असल्याने भालेराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली असून, पक्षश्रेष्ठींकडून त्यांच्या नावाला अनुकूल प्रतिसाद असल्याचे बोलले जात आहे.
सध्या मोहन भालेराव यांनी प्रत्येक मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेण्यावर भर दिला असून, त्यांना जनसामान्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. भालेराव हे सुशिक्षित उमेदवार असल्याने त्यांना तरुण पिढीचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या प्रचारफेरीत मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणी यांच्यासह आबालवृद्धांची गर्दी होताना दिसून येत आहे. त्यामुळेच प्रभाग क्रमांक २७ (अ) अनुसूचित जाती या संवर्गातील राखीव जागेसाठी मोहन दादू भालेराव हेच राष्ट्रवादीचे प्रबळ दावेदार असल्याचे मानले जात आहे. अऊश्ळ.