अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीची सरशी

By admin | Published: February 24, 2017 02:55 AM2017-02-24T02:55:27+5:302017-02-24T02:55:27+5:30

जिल्हा परिषदेच्या देहू-लोहगाव गटामध्ये मंगल जंगम आणि हवेली पंचायत समितीच्या देहूगाव लोहगाव-निरगुडी

NCP's Sarashi in terms of competition | अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीची सरशी

अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीची सरशी

Next

देहूगाव : जिल्हा परिषदेच्या देहू-लोहगाव गटामध्ये मंगल जंगम आणि हवेली पंचायत समितीच्या देहूगाव लोहगाव-निरगुडी वडगाव शिंदे गणामध्ये हेमलता काळोखे या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळविला आहे. या दोन्ही जागांसाठी अतिशय अटतटीशी लढत पाहायला मिळाली.
अनुसूचित जातीसाठी राखीव जागेवर मंगल जंगम यांनी शिवसेनेच्या शैला खंडागळे यांच्यावर १८९ मतांनी विजय मिळविला. पंचायत समितीसाठी हेमलता काळोखे यांनी त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी बंडखोर अपक्ष उमेदवार रत्नमाला करंडे यांचा ११७ मतांनी पराभव केला. समर्थकांनी ढोल-ताशा व डीजेच्या तालावर गुलाल-भंडाऱ्याची उधळण करीत मिरवणूक काढली.
काळोखे यांना ४२०१ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवार करंडे यांना ४०८४, शिवसेनेच्या सारिका शिंदे यांना २५६०, तर भाजपाच्या हेमा मोरे यांना २३०१ आणि कॉँग्रेसच्या वनिता देशकर यांना ३७१ मते मिळाली, १७० मतदारांनी नोटाचा वापर केला. देहूगाव-लोहगाव गटामध्ये राष्ट्रवादीच्या मंगल जंगम यांना ६५४४ मते मिळाली. शिवसेनेच्या शैला खंडागळे यांना ६३५५ आणि भाजपा-आरपीआय युतीचे संतोष चव्हाण यांना ५८४२ मते मिळाली. खंडागळे या देहूगाव ग्रामपंचायतीच्या तीन वेळा, तर चव्हाण हे एकदा सदस्य होते. १५ वर्षांपूर्वी हेमलता काळोखे यांनी कॉँग्रेसच्या तिकिटावर जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली होती. तेव्हा त्यांना विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या मातोश्री सुरेखा कंद यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. देहूगाव ग्रामपंचायतीच्या विद्यमान तीन सदस्या काळोखे, मोरे व करंडे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. यापैकी करंडे आणि मोरे यांनी सरपंचपद भूषविले आहे. (वार्ताहर)

Web Title: NCP's Sarashi in terms of competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.