राष्ट्रवादीचे ‘कचरा फेको’

By Admin | Published: March 24, 2017 04:12 AM2017-03-24T04:12:44+5:302017-03-24T04:12:44+5:30

चिखली परिसरात १५ दिवसांपासून कचरा उचलला जात नाही. महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे

NCP's 'trash fec' | राष्ट्रवादीचे ‘कचरा फेको’

राष्ट्रवादीचे ‘कचरा फेको’

googlenewsNext

पिंपरी : चिखली परिसरात १५ दिवसांपासून कचरा उचलला जात नाही. महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता साने यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर कचरा फेको आंदोलन केले. महापालिका सर्वसाधारण सभेच्या वेळीच महापालिकेसमोर कचऱ्याचा ढीग साचला होता. त्यामुळे नगरसेवक आणि पदाधिकारी अधिकाऱ्यांची कचराकोंडी केली होती.
चिखली परिसरातील गेल्या १५ दिवसांपासून कचरा उचलला जात नाही. महापालिका प्रशासनाचे त्याच्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पिंपरी महापालिकेची आज सर्वसाधारण असल्याने समस्येचे गांभीर्य सत्ताधाऱ्यांच्या लक्षात यावे, याकडे साने यांनी लक्ष वेधले. प्रभागातील कचरा आणून महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर टाकला. याबाबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांना निवेदन देण्यात आले. दोन दिवसांत प्रभागातील सगळा कचरा उचलला जावा. अन्यथा पुन्हा पालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ कचरा आणून टाकला जाईल आणि अधिकाऱ्यांना त्यामध्ये उभे करण्यात येईल, अशा इशारा साने यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: NCP's 'trash fec'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.