आपापसातील वाद मिटविण्याची गरज
By admin | Published: February 7, 2017 03:06 AM2017-02-07T03:06:01+5:302017-02-07T03:06:01+5:30
पिंपळे सौदागर येथील गणेश रेसिडेन्सीमध्ये पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ मर्यादित यांच्या वतीने सोसायटीच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी एका चर्चासत्राचे आयोजन केले होते.
रहाटणी : पिंपळे सौदागर येथील गणेश रेसिडेन्सीमध्ये पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ मर्यादित यांच्या वतीने सोसायटीच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी एका चर्चासत्राचे आयोजन केले होते. या वेळी परिसरातील अनेक सोसायट्यांचे पदाधिकारी होते. अॅड. मृद्रधा जोशी यांनी मार्गदर्शन केले.
या वेळी महासंघाचे उपाध्यक्ष सुरेश दोडूमानी, अनिल असगेकर, अँड. प्रकाश तोंडारे यांच्यासह सोसायटीचे सभासद हजार होते. या प्रसंगी अॅड. जोशी म्हणाल्या, ‘‘अनेक सोसायटीमध्ये वषार्नुवर्षे जुनेच कार्यकारी मंडळ असल्याने त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात सोसाट्यांमध्ये आपआपसात वाद आहेत. ते वाद मिटणे गरजेचे आहे.’’
सोसायटीचे वार्षिक जमाखर्च योग्य रितीने झाला पाहिजे. तसेच, एखादा व्यक्तीला एनओसी हवी असल्याचं योग्य फी आकारणी
झाली पाहिजे, त्यासाठी कोणतेही आगाऊ रक्कम घेऊन एखाद्या सभासदासाची अडवणूक केली गेली नाही पाहिजे, अनेक सोसायटीची पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी, तसेच काही सोसायटची कन्व्हेन्स डिड झालेली नाही. ’’(वार्ताहर)