सर्वत्र समान पाणीपुरवठा होण्याची आवश्यकता

By admin | Published: February 2, 2017 03:48 AM2017-02-02T03:48:35+5:302017-02-02T03:48:35+5:30

नवीन प्रभागाच्या रचनेनुसार प्रभाग क्रमांक १७ हा प्रभाग वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, बिजलीनगर, दळवीनगर असा विस्तारित झाल्यामुळे मोठा झाला आहे. नागरिकांना मूलभूत

The need to have the same water supply everywhere | सर्वत्र समान पाणीपुरवठा होण्याची आवश्यकता

सर्वत्र समान पाणीपुरवठा होण्याची आवश्यकता

Next

रावेत : नवीन प्रभागाच्या रचनेनुसार प्रभाग क्रमांक १७ हा प्रभाग वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, बिजलीनगर, दळवीनगर असा विस्तारित झाल्यामुळे मोठा झाला आहे. नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी कोणतीच भरीव कामे झालेली नाहीत, अशी नागरिकांची तक्रार आहे.
वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, रस्त्यांचा विकास ही आव्हाने कायम आहेत. संपूर्ण प्रभागाला समान पाणीपुरवठा होण्याची गरज आहे. सांडपाणी व्यवस्थेसाठी टाकण्यात आलेल्या पाइपलाइन २० ते २५ वर्षांपूर्वीच्या आणि कमी क्षमतेच्या आहेत. पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नाही.
रेल्वेमार्गालगत झोपडपट्टी आहे. तेथे स्वच्छतागृहे उभारली आहेत. रेल्वेमार्गाच्या कडेने कचरा साचलेला असतो. प्रभागातील कचराही वेळेवर कधीच गोळा केला जात नाही. रेल्वेमार्गावर आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रेल्वेमार्गाच्या कडेने सीमाभिंत बांधण्याची आवश्यकता आहे. रस्त्यांची साफसफाई होत नाही. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यांचा विकास व्हायला हवा. मुख्य रस्त्यावर वाहतुकीचे कोणतेच नियोजन नाही. २ उद्याने आहेत. उर्वरित सार्वजनिक प्रयोजनासाठी प्रभागात कोणतेही आरक्षण नाही. बहुतांश भाग प्राधिकरणबाधित असल्यामुळे पालिका आणि प्राधिकरण यांच्या वादात अनेक विकासकामे रखडलेली आहेत. उद्याने, विरंरुळा केंद्र, क्रीडांगणे, जलतरण तलाव, अद्यावत हॉस्पिटल, पालिकेची माध्यमिक शाळा, भाजी मंडई, स्मशान भूमी आदीची गरज आहे. (वार्ताहर)

परिसरात जलदगतीविकास होणे आवश्यक आहे.येथील नागरिकांना मूलभूत गरजा अपेक्षित प्रमाणात मिळत नाहीत.काही ठिकाणचा विकास पूर्ण झाला आहे. काही भागातील विकास रखडला आहे. नागरिकांकडून निर्माल्य नदीत टाकले जात असल्याने आणि जलपर्णी अधिक वाढल्यामुळे जलप्रदूषण वाढ होत आहे.
- मदन दळे, एकवीरा

वाल्हेकरवाडी ते भोंडवे कॉर्नर यांना जोडणारा मुख्य रस्ता आणि या रस्त्यावरील पुलाचे काम रखडल्यामुळे सातत्याने वाहतूककोंडी होते. परिसरातील अनेक अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असून रस्त्यांची कामे आणि पादचारी मागार्ची कामे शक्य तितक्या लवकर करण्यात यावीत.- श्याम घाडगे, चिंचवडे कॉलनी

पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करावी. आरक्षित जागांवर विकासकामे होणे आवश्यक आहे. माध्यमिक विद्यालयाबरोबर परिसरात महाविद्यालय सुरु होणे अपेक्षित आहे. सार्वजनिक शौचालयाचे प्रमाण कमी असल्यामुळे परिसरात अस्वच्छता अधिक आहे. सांस्कृतिक हॉल, क्रीडांगण होणे आवश्यक आहे. अनधिकृत बांधकामे नियमित करावीत तसेच शास्ती कर रद्द करावा.
-विजय पाटील, साईराज कॉलनी,बिजलीनगर

ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र सुरु व्हावे. ठिकाणी रस्त्यावरच भाजी मंडई भरत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. दिवसेंदिवस भाजी विक्रेत्यांचे रस्त्यावरील अतिक्रमण वाढत चालले आहे. पादचारी मार्गावर व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे.
- सदाशिव जाधव, चिंतामणी चौक

वाल्हेकरवाडी परिसरात सफाई कामगार वेळेत येत नसल्यामुळे रस्ते साफ नसतात.कचरा गाडी वेळेत येत नसल्यामुळे रोजच्या कचऱ्याचे नियोजन योग्य प्रकारे होत नाही.अनेक ठिकाणी कचरा कुंडी आहेत; परंतु कुंडीच्या बाहेर कचरा साचून राहत असल्यामुळे व दुगंर्धी वाढत आहे.
- विनोद राठोड, नंदनवन सोसायटी

वाल्हेकरवाडीचा महापालिकेत समावेश होऊन अनेक वर्षे झाली; परंतु येथे अद्ययावत दवाखाना नाही. अनेक रस्त्यांची दुरवस्था आहे. काही ठिकाणी डांबरीकरण न झाल्यामुळे पावसाळ्यात रस्त्याने चालणेही अवघड आहे. वाल्हेकरवाडीच्या मुख्य चौकात प्रवाशांसाठी साधे बसशेड नाही. सुरक्षतेच्या दृष्टीने परिसरात पोलीस चौकी नाही,महिलांसाठी स्वच्छतागृह नाही. महिला असुरक्षित आहेत.
- रामदास केंदळे, वाल्हेकरवाडी

सार्वजनिक बस वाहतूक कमी प्रमाणात आहे. शहरातील विविध भागांत आणि पुण्यात जाण्या-येण्यासाठी मुबलक प्रमाणात बस नाहीत.वाल्हेकरवाडी ते चिंचवड शटल बस सेवाच सुरु आहे. तीसुद्धा नियमित नसते. परिसरात झाडांची संख्या फार कमी आहे. आवश्यक तेथे वृक्षारोपण व्हावे. काही ठिकाणी उघडी गटारे असल्यामुळे मच्छरांचे प्रमाण अधिक आहे.
- हेमंत ननावरे, ओम साई कॉलनी

परिसरात विकास जलदगतीने होत आहे; परंतु नागरिकांच्या रोजच्या जीवनात लागणाऱ्या मूलभूत सुविधांचा दर्जा वाढविण्याची गरज
आहे. परिसरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था आहे. वारंवार होणाऱ्या रेल्वे अपघाताला आला घालण्यास्ठी रेल्वेरूळालगत संरक्षक भिंत बांधणे आवश्यक आहे.
- मुश्ताक मुल्ला, बिजलीनगर

Web Title: The need to have the same water supply everywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.